Home संगमनेर संगमनेर उपविभागातून आठ जण तडीपार

संगमनेर उपविभागातून आठ जण तडीपार

Breaking News | Sangamner: संगमनेर उपविभागातील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आठ आरोपींना अहिल्यानगर संपूर्ण जिल्हा व लगतच असलेले जुन्नर व सिन्नर तालुक्यांच्या हद्दीच्या बाहेर तडीपार करण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी काढले.

Eight people from Sangamner sub-division were arrested

संगमनेर: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी याकरीता संगमनेर उपविभागातील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आठ आरोपींना अहिल्यानगर संपूर्ण जिल्हा व लगतच असलेले जुन्नर व सिन्नर तालुक्यांच्या हद्दीच्या बाहेर तडीपार करण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी काढले आहेत.

याबाबत अधिक माहिती देताना प्रांताधिकारी हिंगे म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी संगमनेर उपविभागातून आठ जण तडीपार प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. त्यानुसार शुभम संजय चव्हाण एक महिना, संतोष सखाराम देवकाते ६ महिने, भावड्या उर्फ सदेश चिलाप्पा खेमनर ३ महिने, सालम साटम कुरेशी उर्फ सलीम मुस्ताक कुरेशी ६ महिने, जाफर उमर कुरेशी ६ महिने, कमलेश दिलीप डेरे २ महिने, दत्तु उर्फ दत्तात्रय काशिनाथ काशिद ६ महिने व अशोक अनाजी वाकचौरे २ महिने अशा आठ जणांना अहिल्यानगर जिल्हा हद्द व सिन्नर व जुन्नर तालुका हद्दीच्या बाहेर तडीपार करण्याचे आदेश काढले आहेत. यामुळे गुन्हेगारी बर्तुळात खळबळ उडाली आहे.

Web Title: Eight people from Sangamner sub-division were arrested

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here