Home अहमदनगर अहमदनगर: अश्लील हावभाव करणार्‍या आठ महिला पकडल्या

अहमदनगर: अश्लील हावभाव करणार्‍या आठ महिला पकडल्या

Breaking News | Ahmednagar:  शहरातील माळीवाडा बसस्थानकाच्या बाहेर रस्त्याच्या कडेला उभ्या राहून येणार्‍या जाणार्‍या नागरिकांकडे पाहून अश्लील हावभाव आणि इशारे करणार्‍या आठ महिलांना कोतवाली पोलिसांच्या पथकाने पकडून त्यांच्यावर गुन्हा.

Eight women caught making obscene gestures

अहमदनगर:  शहरातील माळीवाडा बसस्थानकाच्या बाहेर रस्त्याच्या कडेला उभ्या राहून येणार्‍या जाणार्‍या नागरिकांकडे पाहून अश्लील हावभाव आणि इशारे करणार्‍या आठ महिलांना कोतवाली पोलिसांच्या पथकाने पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी (21 जून) रात्री साडेआठच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे.

बसस्थानकाच्या बाहेर लकी लॉज ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंतच्या रस्त्यावर काही महिला सायंकाळपासून उभ्या राहतात व येणार्‍या जाणार्‍या नागरिकांकडे पाहून अश्लिल हावभाव, इशारे करत असतात. तसेच मोठ्या आवाजात अश्लील गाणे म्हणत असतात. त्यामुळे येणार्‍या जाणार्‍या नागरिकांची प्रचंड कुचंबना होत असते. अनेकदा तर रात्रीच्यावेळी प्रवाशांशी हुज्जत घालण्याचे, काही प्रवाशांना लुटण्याचे प्रकारही घडलेले आहेत. या महिलांचा बंदोबस्त करण्याची मागणी अनेकदा करण्यात येत होती.

शुक्रवारी रात्रीही असाच प्रकार सुरू असल्याची माहिती कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली. त्यांनी तातडीने एक पथक कारवाईसाठी पाठविले. या पथकाने रस्त्यावर अश्लील हावभाव करणार्‍या आठ महिलांना पकडले. त्यांना कोतवाली पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावर महिला पोलीस अंमलदार पल्लवी रोहकले यांच्या फिर्यादीवरून भा.दं.वि. कलम 294 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110 चे उल्लंघन कलम 117 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Eight women caught making obscene gestures

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here