Home संगमनेर संगमनेर तालुक्यात ग्रामपंचायतीचा शिपाई झाला सरपंच

संगमनेर तालुक्यात ग्रामपंचायतीचा शिपाई झाला सरपंच

Sangamner Taluka Grampanchayat Election: ज्या ग्रामपंचायतीत पाणीपुरवठा विभागाचा शिपाई म्हणून काम केले, त्याच ग्रामपंचायतीत सरपंचपदावर शिंदे आता विराजमान.

Election Sangamner taluk, Sarpanch became a soldier of Gram Panchayat

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील आश्वी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ग्रामपंचायतचे माजी पाणीपुरवठा कर्मचारी नामदेव किसन शिंदे हे अतिशय चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. ज्या ग्रामपंचायतीत पाणीपुरवठा विभागाचा शिपाई म्हणून काम केले, त्याच ग्रामपंचायतीत सरपंचपदावर शिंदे आता विराजमान झाले आहेत.

आश्वी बुद्रुक ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंचपद अनुसूचित जमातीतील व्यक्तीसाठी राखीव होते. या निवडणुकीसाठी आमदार बाळासाहेब थोरात, प्रणित आमरेश्वर ग्रामविकास मंडळाकडून नामदेव किसन शिंदे यांनी उमेदवारी दाखल केली. सरपंचपद आरक्षित झाल्यानंतर त्यांनी आपल्या शिपाईपदाचा राजीनामा देत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला होता. नामदेव शिंदे सुमारे चाळीस वर्षांपासून आश्वी बुद्रुक ग्रामपंचायतमध्ये पाणीपुरवठा विभागात पाणी सोडण्याचे काम करत होते.

तर, त्यांचे वडील किसन शिंदे गावात नळ पाणीपुरवठा योजना अस्तित्वात नव्हती, त्यावेळी सायकलवर गावाला पाणी पुरविण्याचे काम अल्पशा मोबदल्यात करत होते. शिंदे कुटुंबीयांच्या दोन पिढ्या गावाला पाणी पुरविण्याची सेवा करीत होते. त्यामुळे गावानेही त्यांना ग्रामपंचायतीत विजयी करून त्यांना आपल्या कामाची पावती दिली.

Web Title: Election Sangamner taluk, Sarpanch became a soldier of Gram Panchayat

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here