इलेक्ट्रिक मोपेड दुचाकीला आग अन काही मिनिटांत गाडी जळून खाक
Pune News: इलेक्ट्रिक मोपेड दुचाकीने अचानक पेट घेतला, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती.
पिंपरी-चिंचवड : येथे इलेक्ट्रिक मोपेड दुचाकीने अचानक पेट घेतला . या घटनेत सुदैवाने जीवितहानी किंवा कोणी जखमी झालेले नाही. महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालय परिसरात सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली आहे. अचानक गाडीने पेट घेतल्याने जवळची वाहने बाजूला करण्यात आली. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ येऊन आगीवर नियंत्रण मिळवलं.
गेल्या अनेक दिवसांपासून इलेक्ट्रिक मोपेड दुचाकीमध्ये आग लागल्याच्या घटना समोर येत आहे. यामुळे दुचाकी चालकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. पिंपरीतील वायसीएम रुग्णालयाच्या जवळ आज सकाळी साडेआठच्या सुमारास इलेक्ट्रिक मोपेड दुचाकीने अचानक पेट घेतला. डिक्कीमध्ये लागलेल्या आगीने काही मिनिटातच रौद्ररूप धारण केलं. दरम्यान, तात्काळ अग्निशमन दलाच्या जवानांनी येऊन आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. इलेक्ट्रिक मोपेड दुचाकीमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली आहे. इलेक्ट्रिक मोपेड दुचाकीमध्ये अचानक आग लागल्याच्या घटनेने वाहन चालकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण आहे.
Web Title: electric moped two-wheeler caught fire and the vehicle was burnt within minutes
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App