Home संगमनेर कत्तलखान्यासाठी वीज चोरी; चालकाविरुध्द गुन्हा

कत्तलखान्यासाठी वीज चोरी; चालकाविरुध्द गुन्हा

Sangamner Crime: बेकायदा कत्तलखाना चालविणाऱ्या दोघांनी चोरून वीज वापरल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल.

Electricity theft for slaughterhouses Offense against the driver

संगमनेर : बेकायदा कत्तलखाना चालविणाऱ्या दोघांनी चोरून वीज वापरल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. दोघांना कायदेशीर नोटिसा बजावूनही त्यांनी १ लाख २९ हजार ५४२ रुपयांचा दंड भरला नाही. त्यामुळे जोर्वे विभाग कक्ष अभियंत्यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

शाहीद इर्शाद कुरेशी व जहीर इर्शाद कुरेशी (दो- घेही रा. सुकेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. वीज चोरीचा प्रकार सरकार लॉन्स, जमजम कॉलनी परिसरात दोन महिन्यांपूर्वी उघड झाला होता. पोलिसांच्या ही चोरी समोर आली होती. पोलिसांनी शहर अभियंता राजेंद्र शिंदे यांना कळविल्यानंतर त्यांनी सहाय्यक अभियंता सुजय उपाध्ये यांना कारवाईचे आदेश दिले होते. २ हजार ३८० यूनिट वीज चोरी केल्याचे सिद्ध झाले. विद्युत कंपनीच्या कार्यपद्धतीनुसार दंडात्मक नोटीस मालकांना बजावली होती.

Web Title: Electricity theft for slaughterhouses Offense against the driver

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here