क्रिकेट खेळताना मैदानावरच एका अभियंत्याचा हृदयविकाराने मृत्यू
Breaking News | Pune: क्रिकेट खेळताना मैदानावरच एका अभियंत्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना.
पुणे | पिंपरी : पिंपरी चिंचवड परिसरातून मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. क्रिकेट खेळताना मैदानावरच एका अभियंत्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
अभिजीत गोवर्धन चौधरी (वय ३१) असं मृत्यू झालेल्या अभियंत्यांचे नाव आहे. मात्र, पोलिसांनी याची लवकर दखल न घेतल्याने स्थानिक लोकप्रतिनिधिंनी नाराजी व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवडच्या प्राधिकरण परिसरात शनिवारी सकाळच्या सुमारास अभिजित चौधरी हे क्रिकेट खेळत होते. क्रिकेट खेळता खेळता त्यांना अचानक चक्कर आली, त्यावेळी त्यांच्या मित्रांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
मृत्यू झाल्यानंतर पोलिस प्रशासनाच्या हद्दीच्या वादामुळे पंचनामा करण्यास उशीर झाला. त्यांच्या मृत्यूनंतर निगडी पोलिसांना पंचनामा करण्यासाठी कळवले तर त्यांनी हा प्रकार आमच्या हद्दीत घडला नसल्याने पंचनामा करण्यास नकार दिला. त्यानंतर रावेत पोलिसांनी घटनास्थळी भेट देत त्यांच्याकडेही हद्द येत नसल्याचं म्हणत निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याचं म्हटलं. पोलिस वेळेत पंचनामा करत नसल्यामुळे पोलिस प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानंतर रावेत पोलिसांनी पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
Web Title: engineer died of a heart attack on the field while playing cricket
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study