इथेनॉल निर्मितीवरील निबंध हटवले, कारखानदारीला दिलासा
Ahmednagar News: केंद्र शासनाने इथेनॉल निर्मितीचा पुनर्विचार केल्याने साखर उद्योगास चालना मिळणार. (ethanol production).
कोपरगाव : इथेनॉल निर्मितीचा पुनर्विचार करून ठोस निर्णय घेण्यात आला आहे. थेट उसाचा रस, सिरप, बी हेवी मोर्लेसेसपासून ३३ टक्के इथेनॉल निर्मितीचे धोरण पुन्हा कायम केल्याबद्दल संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अभिनंदन केले आहे. या निर्णयामुळे साखर कारखानदारीला दिलासा मिळाला आहे.
केंद्र शासनाने इथेनॉल निर्मितीचा पुनर्विचार केल्याने साखर उद्योगास चालना मिळणार आहे. या निर्णयामुळे संपूर्ण साखर उद्योगास दिलासा मिळणार आहे. बिपीन कोल्हे पुढे म्हणाले की, देशातील ग्रामीण अर्थकारणास इथेनॉल निर्मितीतून मोठी चालना मिळाली आहे. चालू वर्षी उसाचा तुटवडा असल्याने केंद्र शासनाने इथेनॉल निर्मितीवर बंधने घातली होती, ती साखर उद्योगास मारक असून देशात सुमारे ३५५ कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती सुरू केली. राज्यात यासाठी १५५ कारखान्यांनी सुमारे ८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली, गेल्या वर्षी १२० कोटी लीटर इथेनॉल ऑइल कंपन्यांना पुरवले गेले, चालू वर्षी ३०० कोटी लीटर्सपर्यंत वाढ झाली त्यातच केंद्राने आणलेले निबंध यामुळे इथेनॉल निर्मिती करणाऱ्या कारखान्यांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले होते, हे निर्बंध असेच कायम राहिले तर आर्थिक असंतुलन वाढेल तेव्हा या निर्णयाचा फेरविचार करावा म्हणून मागणी लावून धरली होती, त्याचा केंद्र शासनाने शुक्रवारी पुनर्विचार केला. हा साखर उद्योगास दिलासा आहे. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने देशात सर्वप्रथम गेल्या ५ वर्षांपासून थेट उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीत आघाडी घेतली आहे.
Web Title: Essay on ethanol production deleted, relief for an industry
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App