अहमदनगर: माजी सैनिकाचा मृत्यू जलतरण तलावात मृत्यू
Breaking News | Ahmednagar: जलतरण तलावात पोहताना एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना.
अहमदनगर : शहरातील वाडिया पार्क येथील जलतरण तलावात पोहताना एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली. सागर प्रकाश कळसकर (वय ४३, रा. तापीदास, गंजबाजार, अहमदनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
सागर कळसकर हे वाडिया पार्क येथे पोहण्यासाठी आले होते. मात्र ते बराच वेळ पाण्यातून बाहेर न आल्याचे इतरांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांना पाण्यातून बाहेर काढून त्यांचे नातेवाईक राजेंद्र कळसकर यांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; परंतु उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सागर कळसकर हे बीएसएफमधून निवृत्त झाले होते. त्यांनी राजस्थानमध्ये बाडमेर येथे बीएसएफमध्ये सेवा केली होती. सागर कळसकर यांना पोहण्याचा छंद होता. ते निवृत्ती नंतर वाडिया पार्क येथे पोहण्यासाठी नेहमी येत होते; परंतु आज सकाळी जलतरण तलावात पडून त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सागर यांना पोहण्यासाठी तलावात उतरल्यानंतर चक्कर आली असावी किंवा पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते मतीन सय्यद यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी व ठेकेदार या घटनेला जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.
Web Title: Ex-serviceman dies in swimming pool
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study