नाशिक हादरलं; अनैतिक संबंधातून एका माजी सैनिकाची गोळ्या झाडून हत्या
Breaking News | Nashik Crime: अनैतिक संबंधातून एका माजी सैनिकाची गोळ्या झाडून (Firing) हत्या केल्याची धक्कादायक घटना.
नाशिक: अनैतिक संबंधातून एका माजी सैनिकाची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिक शहरात रविवारी (१० मार्च) रात्रीच्या सुमारास घडली. अमोल काठे असे मयत माजी सैनिकाचं नाव आहे. या घटनेनं शहरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपीला अटक केली आहे.
चेतन घडे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. या गोळीबारात अमोल काठे यांचा भाऊ कुंदन गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत अमोल काठे हा माजी सैनिक असून त्याचे चेतनच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते.
याची कुणकुण आरोपी चेतनला लागली होती. त्याने पत्नीला जाब विचारला असता, आपण फारकत घेऊ असं चेतनच्या पत्नीने त्याला सांगितलं. अमोलमुळे संसार मोडल्याचा राग चेतनच्या मनात होता. याच रागातून त्याने रविवारी रात्री अमोलचे घर गाठले.
यावेळी अमोल आणि चेतन यांच्यात शहरातील शंकर मार्गावरील महादेव पार्क परिसरात वाद झाला. मृत अमोल याने चेतनला मारण्यासाठी बंदूक आणली होती. हीच बंदूक हिसकावून आरोपीने अमोलवर गोळीबार केला. या गोळीबारात अमोलचा मृत्यू झाला.
दरम्यान, आरोपी चेतनने मधस्थी करण्यासाठी आलेल्या अमोलचा भाऊ कुंदन याला देखील आरोपीने मारहाण केली. या मारहाणीत कुंदन गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत आरोपी चेतनला अटक केली आहे.
Web Title: ex-serviceman shot dead in an immoral relationship
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study