डान्सबार चालकांना धमकावून खंडणी, अकोले नगरपंचायतीचा भाजप नगरसेवकाला अटक
Crime News: अकोले तालुक्यातील भाजप नगरसेवक खंडणी प्रकरणी अटक करण्यात आल्याची धक्कादायक वृत्त.
भिवंडी | अकोले: अकोले तालुक्यातील भाजप नगरसेवक खंडणी प्रकरणी अटक करण्यात आल्याची धक्कादायक वृत्त समोर आले आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. भिवंडीत मुंबई नाशिक महामार्गलगत डान्सबार चालकांना धमकावून 8 लाख रुपये खंडणी मागितल्या प्रकरणी पोलिसांनी सापळा रचून भाजप नगरसेवकाला रंगेहात अटक केली. या नगरसेवकाकडून 27 हजार रुपये देखील जप्त करण्यात आले आहे.
हितेश कुंभार (वय 33, अकोले नगरपंचायत) साथीदार देवेंद्र खुटेकर व राकेश कुंभकर्ण यांना पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबई येथील भाजप नगरसेवक असल्याचे सांगत भाजप नगरसेवक हितेश कुंभार यांनी भिवंडीत बार चालकांकडून खंडणीसह हप्ता वसुली प्रकरणामध्ये कोनगाव पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली. परंतु पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हितेश कुंभार यांच्या बद्दल चौकशी केली असता हितेश कुंभार हे मुंबईचे नगरसेवक नसून नगर जिल्ह्यातील अकोले नगरपंचायत येथील प्रभाग क्रमांक 4 मधील भाजपचे नगरसेवक असल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे तर भाजप नगरसेवक हितेश कुंभार यांनी 1 डिसेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नवी मुंबई, मुंबई आणि ठाणे परिसरात नियमांची पायमल्ली करणाऱ्या डान्सबार वर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करता त्यांनी एका पत्राद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली आहे. तसेच पोलिस महासंचालक यांच्याकडेही तक्रार केली आहे.
परंतु, दुसरीकडे याच डान्स बार चालकांकडून मोठी रक्कम वसूलण्याचा प्रयत्न देखील भाजपा नगरसेवक हितेश कुंभार यांच्याकडून केला जात होता. भिवंडीतील डान्सबार चालकांकडून एकूण आठ लाख रुपयांची मागणी करण्यात आली ज्यामध्ये गुडलक म्हणून 27 हजार रुपये घेताना कोनगाव पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडले आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी कोनगाव पोलीस करीत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई नाशिक महामार्गालगत कोनगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भिवंडी बायपास येथे अनेक डान्स बार आहेत. त्यापैकी लैला डान्सबार चालक संतोष भोईर व हरीश हेगडे पार्टनरशिपमध्ये चालवतात. या डान्सबारमध्ये हितेश कुंभार येऊन मी मुंबई भाजपचा नगरसेवक आहे व तुमचे बार चालवायचे असेल तर आर्केस्ट्रा बारचे 5 लाख रुपये व सर्विस बारचे 3 लाख रुपये असे एकूण 8 लाख रुपयांची मागणी केली. 25 हजार रुपये महिन्याला हप्ता द्यावा लागेल अशी डान्सबार चालकाकडे मागणी केली. त्यावेळी बार चालकाने सांगितले की मी इतर डान्स बार चालकांना विचारून सांगतो. त्यानंतर हितेश कुंभार यांनी बारचालकाकडे गुडलक स्वरूपात पैशाची डिमांड केली. यावेळी सर्वांशी चर्चा करून गुडलक देऊ असे सांगितल्यानंतर हितेश कुंभार आपल्या साथीदारांसह निघून गेले. दुसऱ्या दिवशी हितेश कुंभार पुन्हा लैलाबारमध्ये साथीदारांसह आले आणि खंडणीची मागणी केली. त्यावेळी 9 बार चालकांनी प्रत्येकी तीन हजार रुपये प्रमाणे एकूण 27 हजार रुपये जमा केले होते.
परंतु, हितेश कुंभार यांनी वन टाइम रकमेबद्दल चर्चा केली आणि ती रक्कम आठ लाख रुपये होती. त्यावेळी बार चालकांनी सांगितले की ही रक्कम फार मोठी आहे हे देणं शक्य होणार नाही. आम्हाला थोडा वेळ पाहिजे. परंतु, हितेश कुमार यांनी सांगितले की जर तुम्ही वन टाइमचे पैसे दिले नाही तर तुम्ही डान्सबार कसे चालवता हे मी पाहतो अशी धमकी दिली. त्यावेळी बार चालकांनी आम्हाला थोडा वेळ हवा असल्याचे सांगत बार चालक संतोष भोईर यांनी बारच्या बाहेर येऊन थेट कोनगाव पोलीस स्टेशन गाठलं व घडलेली सर्व हकीकत पोलिसांसमोर मांडली. पोलिसांनी तत्काळ घटनाचे गांभीर्य लक्षात घेत घटनास्थळी धाव घेत सापळा रचला व पोलिस देखील लैला डान्सबार येथे दाखल झाले आणि मुंबईचे भाजप नगरसेवक असल्याचे सांगणारे हितेश कुंभार यांनी आपल्या साथीदारांसह वन टाइम रकमेची डिमांड केली व गुडलकचे 27 हजार रुपये लैला डान्स बार चालकांकडून स्वीकारत असताना पोलिसांनी भाजपा नगरसेवक हितेश कुंभारसह त्याच्या दोन साथीदारांना रंगेहाथ अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. कोनगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरु केला आहे. या घटनेने अकोले तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी लैला बारचे चालक संतोष बबन भोईर (वय 53, रा.घोडबंदर रोड, ठाणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील तिघांवरही भारतीय दंडसंहितेच्या कलम 384, 386, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे, सध्या तिघेही पोलीस कोठडीत आहेत.
Web Title: Extortion by threatening dance bar drivers, BJP corporator of Akole Nagar Panchayat arrested
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App