श्रीमंतांना हनीट्रॅप मध्ये अडकवून खंडणी, गोड बोलून लिफ्ट मागितली
Breaking News Jalgaon Crime: प्रसिद्ध धनदांडग्याला हनीट्रॅप मध्ये अडकवून संबंधाबाबत व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या महिलेला एक लाख रुपये खंडणी घेताना पोलिसांनी रंगेहात पकडले. (honey traps)
जळगाव : रावेर शहरातील प्रसिद्ध धनदांडग्याला हनीट्रॅप मध्ये अडकवून संबंधाबाबत व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या महिलेला एक लाख रुपये खंडणी घेताना पोलिसांनी रंगेहात पकडले होते. आज आरोपी महीला व तिचा मुलगा याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत घडलेली घटना अशी की, रावेर शहरातील एक प्रतिष्ठित धनदांडग्याला २०१८ मध्ये स्वतःच्या कार मध्ये जळगाव येथे जात असतांना एका ४३ वर्षीय महिलेने (रा. लोणी ता. चोपडा) गाडीत लिफ्ट मागीतली सोबत प्रवास केल्यामुळे दोघांमध्ये मैत्री वाढली. त्यामुळे तिने सदर इसमास घरी जेवणास बोलवले. तिने कोल्ड्रींक्समध्ये गुंगीचे औषध टाकुन त्यास बेशुद्ध कले. या गोष्टीचा फायदा घेत आरोपी महिलेने त्याच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यावेळी शुद्ध हरपल्यामुळे आपल्यासोबत काय घडत आहे हे त्या इसमास ठाऊक नव्हते.
यानंतर तिने त्या संबंधांचे व्हिडिओ चित्रण करून सदर इसमाच्या घरी व सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी त्या इसमास दिली. यामुळे सदर इसमाला बदनामीच्या भीतीपोटी वारंवार तिच्याकडे जावे लागत होते. यानंतर ती महिला या गोष्टीचा गैरवापर करत पीडित इसमाकडे वारंवार खंडणी मागु लागली. २३ डिसेंबर २०२३ पासून सदर महिला व तिचा मुलगा निर्मल पाटील (वय २१) या दोघांच्या खात्यात फोन पे द्वारे सुमारे ११ लाख रुपये पीडित इसमाने टाकले होते. यामुळे सदर महिलेची मागणी वाढत गेली. २१ फेब्रुवारी २०२५ रोजी सदर महिलेने, फिर्यादीने आपल्याकडून ५ कोटी रुपये घेतल्याचा लेखी करारनामा पावती करून घेतला.
या महिलेची पैशांची मागणी वाढत गेल्यामुळे सदर इसम प्रचंड त्रस्त झाला होता. या प्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल आहे. आज(२१ मार्च) महिला आरोपीच्या मुलालाही अटक करण्यात आली आहे. रावेर पोलिस स्टेशन हद्दीतील हनीट्रॅप प्रकरण खूप चर्चेत आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.
Title: Extortion by trapping the rich in honey traps