Home महाराष्ट्र प्रसिद्ध बिल्डरची स्वतः वर गोळ्या झाडून आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये धक्कादायक माहिती

प्रसिद्ध बिल्डरची स्वतः वर गोळ्या झाडून आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये धक्कादायक माहिती

Breaking News | Suicide Crime:  बिल्डरने आपल्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या.

Famous builder commits suicide by shooting himself news

 

नवी मुंबई : नवी मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये बेलापूर येथील किल्ले गावठाण परिसरात एका प्रसिद्ध बिल्डरने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास या बिल्डरने आपल्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांनी ९ एमएमच्या बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की,  गुरू चिचकर असं आत्महत्या करणाऱ्या बिल्डरचं नाव आहे. त्यांनी शुक्रवारी सकाळी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. काही महिन्यांपूर्वी नवी मुंबईत मोठं ड्रग्ज रॅकेट उघडकीस आलं होतं. मुंबईच्या अमली पदार्थ पथकाकडून नवी मुंबईत मोठी कारवाई करत 200 कोटींचे ड्रग्ज जप्त केले होते. या प्रकरणात मयत गुरू चिचकरच्या दोन्ही मुलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली होती. याप्रकरणी पोलिसांनी एका मुलाला अटक केली होती, तर दुसरा मुलगा फरार झाला होता. अटकेतील मुलगा सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

याच ड्रग्ज प्रकरणात गुरू चिचकर यांना NRI पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते. याच चौकशीच्या विवंचनेतून चिचकर यांनी आत्महत्या केल्याचे समजत आहे. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली होती. यामध्ये त्यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत.

सुसाईड नोटमध्ये नेमकं काय?

मुलांच्या ड्रग्ज प्रकरणात पोलिसांकडून सातत्याने छळ केला जात होता, यातूनच आपण जीवन संपवतोय, असे गुरू चिचकर यांनी आपल्या सुसाईट नोटमध्ये लिहिले आहे. एका प्रसिद्ध बिल्डरनं अशाप्रकारे जीवन संपवल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Web Title: Famous builder commits suicide by shooting himself

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here