Home महाराष्ट्र प्रसिद्ध कथ्थक सम्राट पंडीत बिरजू महाराज यांचे निधन

प्रसिद्ध कथ्थक सम्राट पंडीत बिरजू महाराज यांचे निधन

Famous Kathak emperor Pandit Birju Maharaj passed away

Famous Kathak emperor Pandit Birju Maharaj passed away : आपल्या कथ्थक नृत्यासाठी भारतासह जगभरात प्रसिद्ध असलेल्या पद्म विभूषण पंडित बिरजू महाराज यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. त्यांच्या निधनाची माहिती पंडित बिरजू महाराज यांचे नातू स्वारांश मिश्रा यांनी सोशल मीडियावरून दिली आहे.

बिरजू महाराज यांनी रविवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. लखनऊ घराण्यातील बिरजू महाराज यांचे खरे नाव ब्रिजमोहन मिश्रा होते. त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९३८ रोजी लखनऊ येथे झाला होता.

दिल्लीतील राहत्या घरी त्यांचे निधन झाले.  ते ८३ वर्षांचे होते. काल मध्यरात्री त्यांना हृदयविकाराचा झटका झटक्याने निधन झाले.

पंडित बिरजू महाराज हे एक गुरू, नृत्यकार, कोरिओग्राफर, गायक आणि संगीतकार होते. एवढं पुरेसं नाही म्हणून तो वाद्य वाजवायचे, कविता लिहायचे आणि चित्रं काढायचे.

त्यांचे अनेक शिष्य आता सुप्रसिद्ध कलाकार आहेत आणि जगभर पसरलेले आहेत. ‘‘मी महाराष्ट्राला माझा पिता आणि बंगालला माता मानतो. कारण माझ्या कलेची सुरूवात बंगालमध्ये झाली; पण मला अनेक मानसन्मान व नावलौकिक महाराष्ट्राने दिले.” असं पंडित बिरजू महाराज यांनी म्हटलं होतं.

Web Title: Famous Kathak emperor Pandit Birju Maharaj passed away

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here