Home पुणे धक्कादायक! लॉजमध्ये फॅनला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या

धक्कादायक! लॉजमध्ये फॅनला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या

Breaking News Suicide: एका लॉजमध्ये फॅनला दोरीने गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केल्याची घटना.

fan committed suicide by hanging himself with a rope in a lodge

टेंभुर्णी: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर टेंभुर्णी येथील बायपास रस्त्यावरील एका लॉजमध्ये फॅनला दोरीने गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केली ही घटना बुधवारी रात्री साडदहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची टेंभुर्णी पोलीस ठाण्यात अकस्मात मयत नोंद करण्यात आली आहे.

वैभव प्रकाश केचे (वय 24 वर्षे रा. शिराळ टें ता. माढा) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून त्याचा चुलतभाऊ ज्ञानेश्वर दत्तात्रय केचे याने टेंभुर्णी याबाबत खबर दिली आहे.

याबाबत पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, खबर देणारे ज्ञानेश्वर केचे यांना बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास तुझा चुलतभाऊ वैभव प्रकाश केचे याने टेंभुर्णीतील बायपास रस्त्यालगतच्या अनुष्का लॉजमधील खोलीतील फॅनला दोरीने गळफास लावून घेतला

असल्याचे सांगितले त्यामुळे ज्ञानेश्वर केचे, गजानन केचे, सौदागर केचे, बिटु केचे असे सर्वजण टेंभुर्णीतील अनुष्का लॉज येथे आले असता वैभव केचे याने खोलीतील फॅनला दोरीने गळफास लावल्याचे दिसले त्याचा गळफास सोडवून खाली उतरविले व नंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. वैद्यकीय अधिकार्यांनी वैभव याची तपासणी केली असता तो मयत झाल्याचे सांगितले. टेंभुर्णी पोलीस ठाण्यात याबाबत अकस्मात मयत अशी नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार भीमराव गोळे हे करीत आहेत.

Web Title: fan committed suicide by hanging himself with a rope in a lodge

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here