Home संगमनेर संगमनेर: प्रवरा नदी पात्रात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू

संगमनेर: प्रवरा नदी पात्रात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू

Breaking News | Sangamner: शेतकरी प्रवरा नदी पात्रातील मोटार बघण्यासाठी गेले असता पाण्याच्या प्रवाहाने पाय घसरुन पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना.

Farmer dies after drowning in Pravara riverbed

संगमनेर: तालुक्यातील चंदनापुरी येथील शेतकरी प्रवरा नदी पात्रातील मोटार बघण्यासाठी गेले असता पाण्याच्या प्रवाहाने पाय घसरुन पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. २१) दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली आहे. चंदनापुरी येथील शेतकरी भाऊसाहेब (भाऊराव) निवृत्ती कढणे व त्यांचे सहकारी नितीन कढणे हे प्रवरा नदीपात्रात असलेल्या सुपेकर मळा ग्राठिकाणी मोटारीला ‘कचरा गुंतला असल्याने पाहायला गेले असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. त्यात प्राय घसरुन पडल्याने पात्रातील खोलीचा अंदाज न आल्याने भाऊसाहेब कढणे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

तर त्यांचे सहकारी नितीन कढणे यांनी तात्काळ मदतीसाठी आकाश देशमुख यांना संपर्क केला. त्यांनी जाणता राजा प्रतिष्ठान संगमनेरचे मुकेश नरवडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्यासह दगुभाऊ रुपवते, सागर पंधारे, साई रहाणे, सोनू प्रिंदि, चेतन साकुरे व इतरांनी घटनास्थळी धाव घेऊन पात्रात बुडालेल्या भाऊसाहेब कढणे यांचा मृतदेह बाहेर काढला.

सध्या नदीला शेतीसाठी व पिण्यासाठी अर्वतन सुरू आहे. त्यामुळे नदीकाठी शेतकऱ्यांना पाणी मिळत आहे. तर उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर पोहणारे तरूण नदीमध्ये उतरत असून नदीतील खड्ड्यांमुळे दुर्घटना होण्याची शक्यता आहे त्यामुळे पोहणाऱ्यांनी काळजी घेऊन सुरक्षीत ठिकाणी पोहण्यास जावे असे आवाहन संगमनेर नगरपालीके च्या माजी नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे यांनी नागरीकांना केले आहे.

Breaking News: Farmer dies after drowning in Pravara riverbed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here