Home अहमदनगर कोपरगाव: व्याज वसुली आणि जमीन नावावर करुन घेण्यासाठी शेतकऱ्यास डांबून ठेवले, ९...

कोपरगाव: व्याज वसुली आणि जमीन नावावर करुन घेण्यासाठी शेतकऱ्यास डांबून ठेवले, ९ जणांवर गुन्हा

Ahmednaagr News:  अपहरण करून डांबून ठेवले. याबाबत नऊ जणांविरुद्ध गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

farmer was detained to collect interest and transfer the land to the title

कोपरगाव: व्याजाचे पैसे न दिल्याने ते वसुलीसाठी जमीन नावावर करून घेण्यासाठी शुक्लेश्वर उत्तम भुजाडे (रा. आपेगाव, ता. कोपरगाव) याचे अपहरण करून डांबून ठेवले. याबाबत नऊ जणांविरुद्ध गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी शुक्लेश्वर उत्तम भुजाडे हे कोपरगाव तालुक्यातील आपेगाव येथील रहिवासी असून त्यांनी आपल्या आर्थिक चणचण दूर करण्यासाठी शरद आनंदराव गायकवाड त्याचा भाऊ दत्तू आनंदराव गायकवाड, यांचेकडून व्याजाने पैसे घेतले होते. त्यांनी आपली अडचण दूर झाल्यानंतर त्यांनी व्याजाचे पैसे परत केले असल्याचा फिर्यादी यांचा दावा आहे. त्यांनी पैसे देऊनही आरोपी दि. ९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता व ११ डिसेंबर रोजी रात्री ९.३० वाजता शिरसगाव व कोपरगाव हद्दीत येऊन त्यांना वारंवार आणखी पैसे मागण्याचा तगादा लावला होता. त्यासाठी त्यांनी फिर्यादी यांची जमीन त्यांच्या नावांवर करून घेण्यासाठी तगादा लावला होता. त्यासाठी त्यांनी फिर्यादी शुक्लेश्वर भुजाडे यांना आरोपी हर्षल दत्तात्रय गवारे यांचे सांगण्यावरून आरोपींनीं निळ्या रंगाच्या एटींगा गाडीत बसवून अपहरण करून मारहाण केली व त्यांना डांबून ठेवले होते. त्या प्रकरणी फिर्यादी भुजाडे यांनी आरोपी शरद आनंदराव गायकवाड, दत्तू आनंदराव गायकवाड, सुनील भुजबळ, नारायण जाधव, खंडू शरद गायकवाड, हर्षल गवारे व इतर तीन अनोळखी इसम अशा नऊ जणांविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं. ५९४/२०२३ भादंवि. कलम सह कलम-३६५,३२७,३४६, ३४७,३४८, ५०६,३४ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोसई. कुसारे करत आहेत.

Web Title: farmer was detained to collect interest and transfer the land to the title

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here