Home Maharashtra News ‘कांद्याची पण बनवा वाईन’; शेतकऱ्याचं व्यंगचित्र व्हायरल

‘कांद्याची पण बनवा वाईन’; शेतकऱ्याचं व्यंगचित्र व्हायरल

Wine in Grocery

Wine in Grocery : राज्य सरकारने द्राक्षापासून तयार होणारी वाईन सुपर मार्केटमध्ये ठेवण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. असं असताना त्यावरुन विरोधकांकडून चांगलाच गदारोळ उठविला जात आहे. शेतकऱ्याना या निर्णयामुळे फायदा होईल, असं सरकार सांगत आहेत. तर विरोधी पक्ष याला कडाडून विरोध करत आहेत. यावरून मोठे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत.

राज्यात अनेक फळांचे ज्युस आणि त्यापासून वाईन तयार केली जाते. असं असलं तरी त्याला सरकारची अधिकृत मान्यता नाही. केवळ द्राक्षापासून तयार होणाऱ्याच वाईनला परवानगी आहे. नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांत मोठ्या प्रमाणावर द्राक्षाचं उत्पादन घेतलं जातं. त्यातच वाईनसाठी लागणाऱ्या द्राक्षांचं उत्पादनसुध्दा अनेक शेतकरी घेत असतात. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात वाईन तयार करणाऱ्या फॅक्टरीसुध्दा मोठ्या संख्येत आहेत. निफाड तालुक्यातील विंचूर येथे एक वाईन पार्क देखील उभे आहे. मात्र आता वाईन ही दारु की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

यासर्व प्रकरणावर आता एक वेगळीच मागणी एका कांदा उत्पादक शेतकऱ्यानं कार्टुनच्या माध्यमातून केली आहे. ज्यात त्यानं कांदा हा आयुर्वेदिक असून त्याची पण वाईन बनवा आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यालासुध्दा न्याय द्या, अशी मागणी केली आहे. त्यांनी कार्टुनच्या माध्यमातून राज्याच्या कृषीमंत्र्याकडे कवितेच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. नाशिकच्या सटाणा येथील शेतकरी आणि कार्टुनिस्ट संजय मोरे यांनी ही कविता केली आहे. ज्यात त्यांनी कांद्यापासून वाईन तयार केली तर कांदा उत्पादक शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल, अशी व्यंगत्मातक मागणीही केली आहे.

एकुणच ज्या फळापासून वाईन तयार केली जात आहे. ते द्राक्ष अनेक वेळा निर्यातक्षम असतांना अनेक वेळा अडचणीच निर्माण होऊन त्याचं नुकसान होतं, तोच न्याय कांद्याला पण मिळावा आणि कांद्याची देखील वाईन तयार व्हावी, अशी मागणी या शेतकऱ्यानं कवितेच्या माध्यमातून केल्यानं सध्या हे कार्टुन आणि कविता सगळीकडे व्हायरल होत आहे. मात्र कांद्याची वाईन बनवायचं ठरवलं तरी ती पिणार कोण? ही देखील एक विचाराची बाब आहे.

Web Title : Farmers’ demand for onion wine making; cartoon viral

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here