Home क्राईम संगमनेर: शेतकर्‍याच्या डोक्यात कोयत्याने वार! तिघांना अटक

संगमनेर: शेतकर्‍याच्या डोक्यात कोयत्याने वार! तिघांना अटक

Sangamner Crime: गुरे बांधण्याच्या कारणावरून शेतकर्‍याच्या डोक्यात लोखंडी कोयत्याने वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना. Three  arrested.

Farmer's head stab Three arrested

संगमनेर: गुरे बांधण्याच्या कारणावरून शेतकर्‍याच्या डोक्यात लोखंडी कोयत्याने वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील शिरोळेमळा येथून समोर आली आहे.  सदर घटना गुरुवार ता.( २८) सप्टेंबर रोजी सकाळी ०९:४५ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना तिघांना अटकही केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, खंदरमाळवाडी गावाअंतर्गत असलेल्या शिरोळेमळा येथे भास्कर पाटीलबा शिरोळे वय( ६०) हे शेतकरी राहात आहे. गुरूवारी सकाळी पावनेदहा वाजेच्या सुमारास गट नंबर(४४६) मध्ये गुरे बांधली होती. यामुळे गुरे बांधण्याचा राग आल्याने तान्हाजी रामभाऊ शिरोळे याने हातातील लोखंडी कोयत्याने भास्कर यांच्या डोक्याच्या उजवे बाजूला दोन वेळा वार करून गंभीर जखमी करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच अमोल तान्हाजी शिरोळे याने बांबुच्या काठीने मारहाण केली. त्यानंतर सुभाष तान्हाजी शिरोळे व अलका सुभाष शिरोळे या दोघांनी हाताने धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. लाकडी बांबूचे काठीने मारहाण केली. भास्कर शिरोळे यांच्या डोक्यात कोयत्याने वार केल्याने ते रक्तबंबाळ होऊन जबर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बिग ब्रेकिंग. बारामती ॲग्रो कंपनीला सरकारची नोटीस, रोहित पवारांचा २ नेत्यांवर गंभीर आरोप

याप्रकरणी भास्कर शिरोळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी वरील चौघांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ४८१/ २०२३ भादवि कलम ३०७,३२३,५०४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून तिघांना अटकही केली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक उमेश पतंगे हे करत आहे.

Web Title: Farmer’s head stab Three arrested

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here