Home संगमनेर संगमनेरात दुध दर वाढीसाठी शेतकरी रस्त्यावर , सरकार मात्र स्वस्थ

संगमनेरात दुध दर वाढीसाठी शेतकरी रस्त्यावर , सरकार मात्र स्वस्थ

Breaking News | Sangamner:  दुधाला किमान ४० रुपये भाव मिळावा या मागणीसाठी राज्यभर दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरत आहे. 

Farmers on the road for increase in milk price in Sangamner

संगमनेर: दुधाला किमान ४० रुपये भाव मिळावा या मागणीसाठी राज्यभर दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत. उत्पादकांच्या विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आजपासून राज्यात अधिक संघटितपणे आंदोलन सुरू होत आहे.

किसान सभा व समविचारी विविध शेतकरी संघटना, कार्यकर्ते व आंदोलकांमध्ये समन्वय स्थापित करून आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने देण्यात आली आहे. दरम्यान दुध उत्पादक शेतकऱ्यांनी कोल्हार-घोटी मार्ग अडवला असून दुधाला ४० रूपये भाव देन्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. कोल्हार-घोटी मार्गावरील वाहतुक पुर्णपणे ठप्प झाली असून आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दुधाला किमान ४० रुपये भाव मिळावा या मागणीसाठी राज्यभर दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत. वर्षभर सातत्याने तोटा सहन करावा लागल्याने उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी असून राज्यात या नाराजीचा उद्रेक आंदोलनांच्या निमित्ताने पुढे येत आहे. उत्स्फूर्तपणे दूध उत्पादकांनी ठिकठिकाणी रास्ता रोको, उपोषणे, निदर्शने सुरू केली आहेत. सरकारने या सर्व आंदोलनांची दखल घ्यावी व दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य कराव्यात, असे आवाहन दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती सरकारला करत आहे. दरम्यान सरकार मात्र बघ्याची भुमिका घेत असल्याची टीका शेतकरी वर्गाकडून होत आहे. 

दूध दरासाठी दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून आज अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार- घोटी राजमार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. संगमनेर तालुक्यातील चिखली या गावात झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत दुधाला किमान ४० रुपये दर करावा अशी मागणी केली.

अजित नवले यांची भुमिका: 

अकोले: केंद्र सरकारने दूध उत्पादकांच्या जखमेवर मीठ चोळत १० हजार टन दूध पावडर आयात करण्यासाठी परवानगी दिली आहे. हा शेतकरी विरोधी निर्णय तातडीने मागे घ्यावा व देशभरात पडून असलेल्या दूध पावडरला निर्यात अनुदान देऊन दूध उत्पादकांना उत्पादन खर्चावर आधारित किफायतशीर भाव दुधाला कसा मिळेल याच्यासाठी पावले टाकावीत अशी मागणी दूध उत्पादक संघर्ष समितीच्यावतीने राज्य समन्वयक डॉ. अजित नवले यांनी केली आहे.

महाराष्ट्रात आणि देशभरात साडेतीन लाख टन दुधाची पावडर गोदामांमध्ये पडून आहे. अतिरिक्त दूध उत्पादन झाल्याची आवई उठवून दुधाचे भाव ३५ रुपयावरून पाडून २५ रुपयापर्यंत खाली आणण्यात आलेले आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही त्यातून भरून निघत नाही, यामुळे दूध उत्पादक महाराष्ट्रभर मेटाकुटीला आलेले आहेत. आंदोलन करून आपल्या मागण्यांकडे ते सरकारचे लक्ष वेधू पाहत आहेत.

अशा परिस्थितीमध्ये देशात आणि महाराष्ट्रात पडून असलेल्या पावडरला निर्यात अनुदान देऊन ही पावडर देशाबाहेर कशाप्रकारे पाठवता येईल याचा विचार करण्याऐवजी केंद्र सरकार आणखी दुधाची पावडर आयात करणार असेल तर यापेक्षा दुसरे दुर्दैव भारतीय शेतकऱ्यांचे कोणतेही असू शकत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने त्यांचा हा शेतकरी विरोधी निर्णय तातडीने मागे घ्यावा व देशभरात पडून असलेल्या दूध पावडरला निर्यात अनुदान देऊन दूध उत्पादकांना उत्पादन खर्चावर आधारित किफायतशीर भाव दुधाला कसा मिळेल याच्यासाठी पावले टाकावीत अशी मागणी दूध उत्पादक संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आली आहे.

Web Title: Farmers on the road for increase in milk price in Sangamner

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here