संगमनेर: मुलीवर अत्याचार प्रकरणी बापास १२ वर्ष सक्तमजुरी
Breaking News | Sangamner: आईच्या गैरहजेरीत स्वतःच्याच चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या बापाला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने बारा वर्षे सक्तमजुरी आणि वीस हजार रुपये दंडाची शिक्षा.
संगमनेर: आईच्या गैरहजेरीत स्वतःच्याच चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या बापाला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने बारा वर्षे सक्तमजुरी आणि वीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश दिलीप घुमरे यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. संगमनेर शहर पोलिस ठाण्यात २९ सप्टेंबर २०२१ रोजी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन महिला पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले यांनी केला होता. न्यायाधीश दिलीप घुमरे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी काम बघितले. तर या खटल्यात त्यांना अॅड. स्मिता सस्कर यांनी सहाय्य केले. खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने सात साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. पैरवी अधिकारी सहाय्यक फौजदार प्रवीण डावरे, महिला पोलिस कॉन्स्टेबल प्रतिभा थोरात, पी. एस साबळे, दिपाली राहणे व स्वाती नाईकवाडी यांनी या खटल्यात सरकार पक्षाला सहाय्य केले.
Web Title: Father 12 years hard labor in case of rape of girl
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study