Home महाराष्ट्र पत्नी गाढ झोपेत असताना बापाचा मुलीवर अत्याचार, धक्कादायक घटना!

पत्नी गाढ झोपेत असताना बापाचा मुलीवर अत्याचार, धक्कादायक घटना!

Breaking News |Satara Crime:  पत्नी गाढ झोपेत असताना वडिलांनी १२ वर्षीय मुलीवर अत्याचार  केल्याची घटना.

Father Abuses Daughter While Wife Is Fast Asleep

सातारा : मुलगी आणि वडिलांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना माण तालुक्यात घडली असून, पत्नी गाढ झोपेत असताना वडिलांनी १२ वर्षीय मुलीवर अत्याचार केला. त्यातून मुलगी चार महिन्यांची गरोदर असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी नराधम बापाला दहिवडी पोलिसांनी तातडीने अटक केली.

पीडित मुलगी १२ वर्षे नऊ महिन्यांची आहे. पत्नी गाढ झोपेत असताना वडील मुलीवर वारंवार अत्याचार करत होते. हा प्रकार तब्बल दोन वर्षांपासून सुरू होता. काही दिवसांपूर्वी मुलगी चार महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले. यानंतर मुलीकडे आईने विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने हा प्रकार वडिलांनी केला असल्याचे सांगितले. हे ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली.

तिने मंगळवारी दहिवडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर संबंधित नराधम बापाला तातडीने बेड्या ठोकल्या. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Father Abuses Daughter While Wife Is Fast Asleep

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here