Home Maharashtra News खासगी सावकाराच्या जाचामुळे दोन मुलांसह बापाची आत्महत्या

खासगी सावकाराच्या जाचामुळे दोन मुलांसह बापाची आत्महत्या

Nashik Suicide News:  खासगी सावकारांकडून वसुलीचा तगादा मागे लागल्याने सामूहिक आत्महत्या.

Father commits suicide with two children due to pressure from a private moneylender

सातपूर | नाशिक : खासगी सावकारीच्या जाचाला कंटाळून एका फळ विक्रेत्याने त्याच्या दोन मुलांसह सामूहिकरीत्या गळफास घेऊन आत्महत्या केल्याने सातपूर परिसर हादरला आहे.

रविवारी दुपारच्या सुमारास ही खळबळजनक घटना उघडकीस आली असून पोलिसांना घटनास्थळी सुसाइड नोटही आढळून आली आहे. त्यात खासगी सावकारांकडून वसुलीचा तगादा मागे लागल्याने सामूहिक आत्महत्या करीत असल्याचे तिघांही बापलेकांनी सुसाइड नोटमध्ये नमूद केले असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

मूळचे देवळा तालुक्यातील उमराणे येथील असलेले फळ विक्रेते दीपक शिरोडे हे त्यांचा मोठा मुलगा प्रसाद (२५) आणि राकेश (२३) यांचा फळविक्रीचा व्यवसाय होता. शिरोडे कुटुंबातील तिघाही बाप लेकांनी घरातील तीन खोल्यांमध्ये फॅनच्या हुकला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन जीवन संपविले.

Web Title: Father commits suicide with two children due to pressure from a private moneylender

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here