संगमनेर: अनैतिक संबंधाच्या संशयातून सासऱ्याचा खून, मृतदेह जाळला, दोघांना अटक
Sangamner Crime: घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेले खून प्रकरण उघडकीस आले असून हा प्रकरण अनैतिक संबंधातून झाला असल्याचे समोर.
संगमनेर: घारगाव हद्दीत फॉरेस्ट जमिनीत बांधावर एका पुरुषाचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील प्रेत आढळून आले होते. याप्रकरणी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेले खून प्रकरण उघडकीस आले असून हा प्रकरण अनैतिक संबंधातून झाला असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी खून करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक केली असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे.
यामधील मयताचे नाव गोरख दशरथ बर्डे (वय ४८, रा. मिरपुर, लोहारे, तालुका संगमनेर) असे असून त्याला मारणारे दिनेश शिवाजी पवार (रा. वडगाव कांदळी ता. जुन्नर) आणि विलास पवार (राहणार पेमदरा, ता. जुन्नर ात जिल्हा पुणे) अशी आहेत. यातील आरोपी दिनेश शिवाजी पवार हा मृताचा जावई आहे. तर विलास पवार हा आरोपी शेजारी राहणारा आहे. दोन्ही आरोपींच्या पत्नीशी मयताचे अनैतिक संबंध असल्याचा चिंट संशय त्यांना होता. त्यावरून त्यांनी त्याला माळवाडी येथे एका नातेवाईकाच्या लग्नात वरातीला पत बोलवून त्याचा खून केला व ओळख पटू नये म्हणून त्याचा चेहरा जळाला असल्याचे उघडकीस आले तर असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. दोन्हीही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक १६ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी फॉरेस्ट जमिनीत बांधावर एका पुरुषाचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील प्रेत आढळून आले होते. त्यावेळी ही व्यक्ती कोण आहे याचा खुलासा झाला नव्हता. मात्र पोलिसांनी तपास करून मयत व्यक्ती कोण व त्याचा खून कोणी केला हे उघड केले आहे. १६ डिसेंबर रोजी फॉरेस्ट जमिनीमध्ये एका पुरुषाचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील प्रेत आढळून आले होते. ही घटना जांभूळवाडी शिवारात वनविभागाच्या जागेत झाली होती. त्यावेळी रणखांब गावचे पोलीस पाटील साहेबराव बाबुराव बारवे यांनी यासंदर्भात घारगाव पोलीस ठाण्यात यासंदर्भात माहिती देऊन त्यांच्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये अज्ञात व्यक्ती मयत झाल्याची नोंद करण्यात आली होती. मयताचा कुणीतरी खून करून कोणता तरी ज्वलनशील पदार्थ वापरून जाळण्याचा प्रयत्न झाला होता व चेहरा ओळखू येऊ नये असे प्रयत्न केले होते. पोलिसांपुढे ओळख पटवणे व खून कोणी केला याचे आव्हान होते. पोलिसांनी याचा छडा लावत दोन गुन्हेगारांवर गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे.
Web Title: Father-in-law killed on suspicion of immoral relationship, body burnt
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App