Home अहमदनगर अहमदनगर: वडिलांनी चाकूने सपासप वार करुन केली मुलाची हत्या

अहमदनगर: वडिलांनी चाकूने सपासप वार करुन केली मुलाची हत्या

Breaking | Ahmednagar: वडिलांनी तरुण मुलावर चाकूने वार करुन हत्या केल्याची घटना.

father killed the son by stabbing him with a knife

नेवासा:  तालुक्यातील शिंगवेतुकाई येथे वडिलांनी तरुण मुलावर चाकूने वार करुन हत्या केल्याची घटना घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरुन सोनई पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत मयताची पत्नी ज्योती रवींद्र पुंड रा. शिंगवेतुकाई शिवार (हॉटेल कृष्णा च्या मागे) हिने दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, ७ मार्च रोजी रात्री १० वाजता फिर्यादी, आरोपी, मुलगा हे सर्वजण एकत्रित जेवण करत असताना आरोपीने घरात मोठमोठ्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मुलाने आरोपीस शिवीगाळ करु नका असे सांगितले. त्याचा राग मनात धरून समोरच असणाऱ्या हॉटेल कृष्णा मधून चाकू घेऊन येत मयत रवींद्र पुंड याच्यावर सपासप वार करत खून केला.

या फिर्यादीवरुन आरोपी भिमराज किसन पुंड याचे विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंण १००/२०२४ भारतीय दंड विधान कलम ३०२, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी सोनई पोलीसांनी धाव घेत आरोपीस तातडीने ताब्यात घेतले. त्यास न्यायालयात हजर केले असता तिन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास सोनई पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुरज मेढे हे करत आहेत.

Web Title: father killed the son by stabbing him with a knife

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here