धक्कादायक! दलित मुलीवर प्रेम केल्याने वडिलांनी मुलाला संपवले; बनाव रचला, पण
Breaking News | Akola Crime: वडिलांनीच आपल्या पोटच्या मुलाची हत्या (Murder) केल्याचा धक्कादायक प्रकार अकोला जिल्ह्यात पोलीस तपासात उघडकीस, बनाव केला पण पोलीस तपासात प्रकरण उघडकीस.
अकोला : दलित समाजाच्या मुलीवर प्रेम केल्याच्या कारणावरून संतप्त वडिलांनीच आपल्या पोटच्या मुलाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार अकोला जिल्ह्यात पोलीस तपासात उघडकीस आला. दुसऱ्या मुलाच्या मदतीने वडिलांनी मुलाचा गळा आवळून जीव घेतला. घटनेनंतर संपूर्ण कुटुंब बाहेरगावी पसार होऊन मुलाला कोणी तरी मारल्याचा बनाव रचला मात्र पोलीस तपासात सत्य उघडकीस आले आहे. संदीप नागोराव गावंडे (२६) असे मृताचे, तर नागोराव कर्णाजी गावंडे असे आरोपी वडिलांचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्याच्या बार्शीटाकळी तालुक्यातील टिटवा गावात नागोराव गावंडे त्यांच्या कुटुंबासह राहत होते. त्यांचा मुलगा संदीप हा पुण्यातील एका कंपनीत कामाला होता. संदीपचे गावातील एका अनुसूचित जातीच्या कुटुंबातील मुलीशी प्रेम होते. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचे प्रेम संबंध वडिलांना मान्य नव्हते. त्यामुळे घरात वाद देखील निर्माण होत होता. दोघांनी पळवून जाऊन लग्न करण्याचे ठरवले. ही गोष्ट संदीपच्या वडिलांना कळली. त्यावरून वडील नागोराव व संदीपमध्ये वाद झाला. या दरम्यान वडिलांनी आपल्या दुसऱ्या मुलाच्या मदतीने घरातच संदीपचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर संदीपचे हातपाय बांधून घराला कुलूप लावून सर्व बाहेरगावी निघून गेले. शुक्रवारी सायंकाळी घरी परतले आणिआपल्या मुलाला कोणीतरी मारले, असा बनाव रचला. पोलिसांच्या तपासात सर्व प्रकार उघडकीसझाला. या प्रकरणी वडील आणि मृतकाचा भाऊ यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पिंजर पोलीस करीत आहेत.
Web Title: Father kills son for loving Dalit girl Forgery, though
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study