Home अहमदनगर अहमदनगर: राहत्या घरातून पळवून नेऊन विवाहितेवर बाप-लेकाने केला अत्याचार

अहमदनगर: राहत्या घरातून पळवून नेऊन विवाहितेवर बाप-लेकाने केला अत्याचार

Breaking News | Ahmednagar Crime: राहत्या घरातून पळवून नेऊन तिच्यावर बाप- लेकाने अत्याचार केल्याची घटना.

Father-leka tortured the married woman by abducting her from her residence

अहमदनगर: विवाहित महिलेला तिच्या राहत्या घरातून पळवून नेऊन तिच्यावर बाप- लेकाने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. मुळची आष्टी (जि. बीड) तालुक्यातील व सध्या नगरमध्ये राहणाऱ्या पीडित विवाहितेने काल, मंगळवारी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात बाप – लेकाविरोधात अत्याचार, अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.

प्रसाद बहिरू दारकुंडे व बहिरू लक्ष्मण दारकुंडे (दोघे रा. बहिरवाडी ता. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या बाप लेकाची नावे आहेत. १० फेब्रुवारी २०२४ रोजी प्रसाद दारकुंडे हा फिर्यादी सध्या राहत असलेल्या उपनगरातील घरी आला. त्याने फिर्यादीला धमकी देऊन बळजबरीने दुचाकीवर बसवून त्याच्या घरी बहिरवाडी येथे नेले. तेथे प्रसादचे वडिल बहिरू दारकुंडे होते. फिर्यादीने त्यांना घरी सोडण्यास सांगितले असता त्याने, ‘तुला आता आम्ही तुझ्या घरी सोडणार नाही, तुला येथे आमच्या घरीच राहावे लागेल’, असे म्हणून फिर्यादीला तेथेच ठेवले. फिर्यादी झोपलेली असताना ११ फेब्रुवारी रोजी प्रसाद याने तिच्यावर अत्याचार केला. प्रसाद १३ फेब्रुवारी रोजी शेतात गेलेला असताना बहिरू दारूकुंडे याने देखील फिर्यादीवर अत्याचार केला.

दरम्यान, फिर्यादी मिसिंग असल्याची तक्रार तिच्या पतीने कोतवाली पोलीस ठाण्यात दिली होती. याची माहिती प्रसाद व बहिरू यांना मिळाल्याने त्यांनी फिर्यादीला कोतवाली पोलीस ठाण्यात हजर केले. त्यानंतर फिर्यादीने पोलिसांना घडलेली घटना सांगून गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपअधीक्षक (नगर शहर) अमोल भारती करीत आहेत.

Web Title: Father-leka tortured the married woman by abducting her from her residence

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here