ठाणे | Thane Crime: ठाण्यातील कळवा परिसरातील एका अल्पवयीन गतीमंद मुलीसोबत चॉकलेटचे आमिष दाखवून अत्याचार (Rape) करणाऱ्या एक व्यक्तीला कळवा पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे आरोपी हा विवाहित असून त्याला तीन मुले आहेत. ठाण्यातील कळवा येथील शांतीनगर परिसरात राहणाऱ्या एक 16 वर्षीय अल्पवयीन गतीमंद मुलीसोबत त्याच परिसरात राहणाऱ्या एका 36 वर्षीय व्यक्तीने अत्याचार केल्याची घटना 6 मार्च रोजी घडली होती.
श्रीकांत गणेश गायके असे आरोपीचे नाव आहे. मुलगी गतीमंद असल्यामुळे केलेल्या कृत्याची कुणकुण कोणाला लागणार नाही असे समजून आरोपी गफील होता. मात्र मुलगी ही पूर्ण गतीमंद नसल्यामुळे तिने आपल्यासोबत घडलेला प्रकार काही प्रमाणात माहिती कुटुंबियांना दिली.
कुटुंबातील एका सदस्याने याबाबतची तक्रार ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय बालक संरक्षण हेल्पलाईन नंबर वर फोन करून दिली. या तक्रारीवरून जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी यांनी कळवा पोलिसांना घटनेची माहिती कळवली. पोलिसानी तपास सुरु केला असता पीडित मुलीची विचारपूस केल्या नंतर मुलीने त्या व्यक्तीचे थोडक्यात वर्णन सांगितले. त्यानुसार पोलिसांनी तपास करून नराधम श्रीकांत गायके याला अटक (Arrested) केली.
नराधम श्रीकांतला ताब्यात घेऊन पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखविताच गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्ह्याची (Crime) नोंद करत आरोपीस अटक केली. श्रीकांत गायके हा विवाहित (Married) असून तीन मुलांचा बाप आहे. तसेच तो आरोपी गेल्या काही महिन्यांपूर्वी या परिसरात राहण्यासाठी आला असून तो नालेसफाई आणि बांधकाम सारखे मंजूरी काम करत होता. या परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन गतीमंद मुलीवर त्याची नजर पडली आणि त्यानंतर त्याने मुलगी गतीमंद असल्याचा फायदा घेत तिला चॉकलेटचे आमिष दाखवून बंद पडलेल्या मफतलाल कंपनीच्या जागेतील दाट झाडी झुडपातील एका खड्ड्यात तिच्यावर अत्याचार (Sexually abusing) केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Web Title: Father of three rape 16-year-old girl