Home नाशिक काही दिवसांनी मुलाचे लग्न, आई वडिलांनी संपविले जीवन

काही दिवसांनी मुलाचे लग्न, आई वडिलांनी संपविले जीवन

Breaking News | Nashik Suicide:  कुटुंबीयांसोबत जेवण केल्यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारात वरपित्यासह वरमाईने घरात विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली.

few days later, the son got married, the parents ended their lives

नाशिक: मुलाच्या विवाह ठरल्याच्या निमित्त एकत्रित आलेल्या कुटुंबीयांसोबत जेवण केल्यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारात वरपित्यासह वरमाईने घरात विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली आहे.

शरणपुर रोडवरील टिळकवाडी येथील यशकृपा बंगल्यात हा प्रकार घडला असून, रक्षा जयेश शहा (वय ५५) व त्यांचे पती जयेश रसिकलाल शहा (वय ५८) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून, सरकारवाडा पोलिसांनी मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, कुटुंबात आनंदाचे वातावरण असताना दाम्पत्याने अचानक आत्महत्या का केली, यासह या घटनेमागे इतर काही कारणे आहेत का, यासंदर्भात पोलीस तपास करीत आहेत.

रक्षा व जयेश यांनी रविवारी (दि.५) रात्री अकरा वाजता बंगल्यात विषारी औषध प्राशन केल्याचे त्यांच्या मुलाने बघितले, त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविल्यानंतर सोमवारी (दि.६) पहाटे दोन वाजेच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांनाही मृत घोषित केले. सरकारवाडा पोलिसांनी दाम्पत्याच्या खोलीची तपासणी केल्यावर तिथे नियमित औषधांसह चष्मा व इतर साहित्य आढळले. संशयास्पद कोणतीही बस्तू किंवा आत्महत्येपूर्वीची चिड्डी सापडलेली नाही. नातलगांकडे पोलिसांनी चौकशी केली असून, आत्महत्येच्या कारणाचा उलगडा झालेला नाही.

दाम्पत्याच्या पश्चात दोन मुले असून, त्यापैकी एक विवाहित आहे. मोठा मुलगा बांधकाम क्षेत्रात कार्यरत असून, धाकट्याचे २६ जानेवारी रोजी लग्न नियोजित आहे. त्याच्या लग्नानिमित्त रविवारी (दि.५) एका धार्मिक विधीसाठी त्यांचे नातलग एकत्र आले. सुमारे वीस जणांनी बंगल्यात एकत्रित जेवण केले. त्यानंतर मोठा मुलगा कामानिमित्त घराबाहेर गेला व धाकटा देवदर्शनासाठी गेला होता. रात्री दहा वाजेच्या सुमारास रक्षा यांनी मोठ्या मुलाला फोन केला, तेव्हा त्यांचा आवाज हुंदका लागल्यासारखा येत होता, असा दावा नातलगांनी पोलिसांसमोर केला. तर काहीवेळात मोठा मुलगा घरी पोहोचल्यानंतर त्याने आई-वडिलांनी विषारी औषध प्राशन केल्याचे बघितले. त्यानंतर रुग्णालयात दाखल केले.

Web Title: few days later, the son got married, the parents ended their lives

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here