Home Crime News ‘स्टेट्स’ च्या वादातून दोन गावांतील तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी

‘स्टेट्स’ च्या वादातून दोन गावांतील तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी

Kolhapur Crime

Kolhapur Crime : “असा स्टेटस का ठेवलास?” या कारणावरून कोल्हापूर जिल्ह्यातील मुदाळतिट्टा याठिकाणी दोन गावातील युवकांमध्ये आज सकाळी तुफान हाणामारी झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे अनर्थ टळला. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की स्टेटस ठेवल्याबाबत विचारपूस केल्याच्या कारणावरून मुदाळ आणि आदमापूर या दोन्ही गावातील युवकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली.

सकाळची वेळ असल्यामुळे कॉलेज विद्यार्थ्यांचा मोठा जमाव जमला होता. याच वेळी ही हाणामारी झाल्याने सर्वांनी गलका केला. यांच्यात सुरवातीला शाब्दिक चकमक झाली. नंतर विषय हमरीतुमरी व हाणामारीपर्यंत आला. प्रकरण हाताबाहेर जाताच पोलिसांना पाचारण करण्यात आले. भुदरगड व मुरगुड पोलिसांनी तत्परता दाखवल्याने जमाव पांगवण्यात यश आले. पोलीस व स्थानिक मध्यस्थांच्या मार्फत सदर हाणामारीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

या घटनेमुळे प्रवासी व पालक वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे. ऑनलाइन शिक्षण प्रणालीमुळे विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल आला आहे. त्यामुळे मोबाईलचा दुरुपयोग सुद्धा होऊ लागलेला आहे. त्यामुळे पालकांनी त्या मोबाईल वापरा संदर्भात आपल्या पाल्यांकडे वारंवार चौकशी करून सजग रहावे अशी घटनास्थळी चर्चा सुरू होती. दरम्यान या घटनेची भुदरगड पोलीस ठाण्यात नोंद झाली नसल्याची माहिती देखील समोर येत आहे.

Web Title : Fighting between youths in two villages over whatsapp status dispute in Kolhapur district

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here