Home अहमदनगर पैशासाठी तगादा, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; Suicide

पैशासाठी तगादा, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; Suicide

Ahmednagar News:  पैशासाठी सातत्याने फोन करून त्रास दिल्याने एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

Fighting for money, youth commits suicide by hanging himself

अहमदनगर: पैशासाठी सातत्याने फोन करून त्रास दिल्याने एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अविनाश अशोक पवार (रा. जेऊर बायजाबाई, ता. नगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. अविनाश यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेश पाटील व राजू कचरे (दोघे रा. शेवगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, मयताकडे सापडलेल्या चिठ्ठीमध्ये दोघांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. याबाबत मयत अविनाश यांचे भाऊ अजय अशोक पवार (रा. जेऊर बायजाबाई) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे भाऊ अविनाश पवार यांनी फोनवरून कर्ज घेतले होते. त्यापोटी संशयित आरोपींना अविनाश यांनी वेळोवेळी पैसे दिले होते. असे असताना संशयित आरोपी यांनी अविनाश यांच्याकडे पैशांसाठी तगादा लावला होता. पैसे देऊनही आरोपींनी फोन करून मयतास मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून अविनाश यांनी शुक्रवारी (दि. 18) दुपारी दोन वाजेच्या सुमारास घरासमोरील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

याप्रकरणी  एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.

Web Title: Fighting for money, youth commits suicide by hanging himself

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here