Home अहिल्यानगर नगरसेवकासह चौघांविरोधात अ‍ॅट्रॉसिटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल

नगरसेवकासह चौघांविरोधात अ‍ॅट्रॉसिटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल

Filed Crime of atrocity and molestation against the four including the corporator

शेवगाव | Crime: अर्बन बँकेत पतीस नोकरी लावून देतो असे म्हणत पैसे घेतले मात्र नोकरी लावली नाही.घेतलेल्या पैशांचा तगादा केला असता जातीवाचक शिवीगाळ व विनयभंग केला असल्याची तक्रार महिलेने केली आहे. यावरून शहरातील नगरसेवकासह चार जणांविरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी, विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

ललिता तापडिया व नगरसेवक कमलेश गांधी यांनी पतीस अर्बन बँकेत नोकरीस लावून देतो असे म्हणून १० लाख रुपयांची मागणी केली होती. त्यातील ५ लाख ५० हजार रुपये रोख घेतले होते. उर्वरित रकमेसाठी बँक ऑफ महाराष्टाचे तीन कोरे धनादेश घेतले होते. त्यानंतर पतीला नोकरी न दिल्याने फिर्यादी महिला व गांधी तापडिया यांच्यात वाद झाले. त्यानंतर ललिता तापडिया हिने फिर्यादी महिलेच्या पतीविरुद्ध धनादेश न वटल्याचा गुन्हा न्यायालयात दाखल केला.

१५ मार्च २०२१ रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान फिर्यादी महिला घरात एकटीच असताना कमलेश गांधी, ललिता तापडिया, जगदीश तापडिया, शरद जोशी रा. देशपांडे गल्ली ता. शेवगाव हे तेथे आले. जातीवाचक शिवीगाळ केली. तुम्हाला जास्त झाले काय? तुमचा खून करू असे कमलेश गांधी, शरद जोशी, जगदीश तापडिया म्हणू लागले. त्यावर ललिता तापडिया हिने मारहाण केली. आमच्या नादाला लागू नकोस घरासकट तुम्हाला जाळून टाकू असे जातीवाचक शिवीगाळ केली. जगदीश तापडिया व गांधी यांनी फिर्यादी महिलेशी लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असे फिर्यादीत म्हंटले आहे.

Web Title: Filed Crime of atrocity and molestation against the four including the corporator

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here