फिल्मिस्टाईलने हातात गावठी कट्टा घेऊन रील्स काढले तरुणाला महागात पडले
Breaking News | Ahmednagar: इन्स्टाग्रामवर गावठी कट्ट्याची रिल्स् टाकणारा अल्पवयीन मुलासह गावठी कट्टा व त्याच्या साथीदाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद.
नगर : इन्स्टाग्रामवर गावठी कट्ट्याची रिल्स् टाकणारा अल्पवयीन मुलासह गावठी कट्टा व त्याच्या साथीदाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून गावठी कट्टा व जिवंत काडतूस जप्त केले.
मिलिंद जालिंदर मरकड (वय १९, रा. मांडे मोरगव्हाण, ता. नेवासा) व एमआयडीसी परिसरातील गजानन कॉलनीमध्ये राहणाऱ्या विधिसंघर्षी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांचे पथक जिल्ह्यातील पिस्तुल बाळगणाऱ्यांची माहिती घेत असताना इन्स्टाग्रामवर फिल्मिस्टाईलने हातात गावठी कट्टा घेऊन फिरणारी रिल्स दिसली. त्या इन्स्टाग्रामवरील रिल्सची तांत्रिक विश्लेषण करून तपास केला असात त्या खऱ्या असल्याचे समोर आले.
त्यानुसार पोलिस निरीक्षक आहेर यांनी पोलिस अंमलदार रविंद्र कर्डिले, ज्ञानेश्वर शिंदे, गणेश भिंगारदे, रणजित जाधव, रोहित मिसाळ, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, संतोष खैरे, विजय ठोंबरे व प्रशांत राठोड यांचे पथक नेमूण तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने इन्स्टाग्रामवरील तरुणाचा सोनई परिसरात शोध घेत असताना तो घोडेगाव ते मिरी रस्त्यावर मांडेमोरगव्हाण शिवारात कानिफनाथ मंदिराजवळ साथीदारासह गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याची माहितीमिळाली. त्यानुसार पथकाने सापळा लावून मिलिंद जालिंदर मरकड (वय १९, रा. मांडेमोरगव्हाण, ता. नेवासा) व एक विधिसंघर्षीत बालकाला ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता तीस हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा व पाचशे रुपयांचे जिवंत काडतूस असा एकूण ३० हजार ५०० रपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Filmstyle took the reels with Gavathi katta in hand and cost the young man
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study