Home अहमदनगर विवाहित तरुणीचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ, ५ दिवसाचे मुल  

विवाहित तरुणीचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ, ५ दिवसाचे मुल  

finding the body of a married woman in a well its murder or suicide

राहता | Rahata: तालुक्यातील वाकडी येथील श्री खडेराय देवस्थानच्या नजीकच असणार्‍या जाधव वस्ती येथील गट नंबर 510 मधील विठ्ठलराव आबाजी जाधव यांच्या विहिरीत 22 वर्षीय विवाहित तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सदर तरुणीचा मृतदेह हा येथील देवस्थानच्या सुरक्षा रक्षकाच्या सुन सुजाता उर्फ डल्ली प्रकाश सुनार (नेपाळ) असे नाव असल्याचे समजते आहे. मयत सुजाताने 5 दिवसापूर्वीच एका नवजात बालकाला जन्म दिला आहे.

प्रकाश सुनार (मुसीकोट नगरपालिका, ता. जि. रुकुम नेपाळ) हा येथीलच हॉटेलमध्ये मजुरीचे काम करतो. येथील देवस्थानच्या सुरक्षा रक्षक म्हणून प्रकाशचे वडील काम बघतात. प्रकाशची पत्नी व वडील हे वाकडी येथील देवस्थानच्या रूममध्ये राहतात. येथील रहिवाशी विठ्ठलराव जाधव यांच्या वस्तीलगतच स्वमालकीची विहीर आहे. दि. 14 नोव्हेंबर रात्री 2 च्या सुमारास अचानक आरडाओरड सुरु झाली. आजुबाजुचे स्थानिक नागरिक जमा झाले. तेव्हा विहिरीच्या कडेला चप्पल आढळून आली.

सकाळी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गोरे, बढे, कॉ. संतोष कराळे, अशोक पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली.  स्थानिक युवकांच्या मदतीने सुमारे 3 तासाच्या अथक प्रयत्नानंतर गळाच्या साह्याने मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला.

मयत सुजाताने 5 दिवसापूर्वीच एका नवजात बालकाला जन्म दिला आहे. एक मुलगी, पती, सासरे असा परीवार आहे. दि. 13 रोजी तिला हॉस्पिटलमधून घरी आणण्यात आले होते. रात्री 2 च्या सुमारास मृत सुजाता ही देवस्थानच्या बाथरुमकडे गेली असता ती परत आली नाही म्हणून तिची नणंद व सासरे हे बघण्याकरिता गेले असता विहिरीच्या जवळ चप्पल आढळून आली, असे नातेवाईकांनी सांगितले. परंतु ही घटना कशी घडली, नेमकी हत्या का आत्महत्या (Murder or Suicide) याबाबत चर्चेला मात्र उधाण आले आहे. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन करुन पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अधिक  तपास पो. नि. साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड. कॉ. अशोक आडांगळे हे करत आहे.

Web Title: finding the body of a married woman in a well its murder or suicide

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here