संगमनेर: महावितरणच्या पॉवर हाउसमध्ये लागली आग
Breaking News | Sangamner: महावितरण कंपनीच्या संगमनेर शहरातील नवीन नगर रस्त्यावरील पॉवर हाउसमध्ये अचानक आग लागल्याची घटना.
संगमनेर : महावितरण कंपनीच्या संगमनेर शहरातील नवीन नगर रस्त्यावरील पॉवर हाउसमध्ये शनिवारी (दि.०६) दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. संगमनेर नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाद्वारे पाणी मारून ही आग आटोक्यात आणण्यात आली.
पॉवर हाउसमध्ये संरक्षण भितींना खेटून अनेक झाडे आहेत. परिसरात स्वच्छता होत नसल्याने मोठ्या प्रमाणात पालापाचोळा, कचरा साचतो. एका झाडाखाली साचलेल्या पालापाचोळ्याचा आग लागून ती मोठ्या प्रमाणात इतरही ठिकाणी पसरून झाडांपर्यंत पोहोचली. आगीचे लोळ मोठ्या प्रमाणात उठत असल्याने, परिसरातील नागरिकांनी संगमनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्याशी संपर्क केला. त्यांनी तातडीने अग्निशमन दलाला याबाबत माहिती देण्यात आली. काही वेळातच नगरपरिषदेचे कर्मचारी अग्निशमन दलाचा बंब घेऊन पॉवर हाउसमध्ये पोहोचले. पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळविले. दोनदा अग्निशमन बंब बोलावून आग शमविण्यात आली. सुदैवाने या घटनेत कुठलेही नुकसान झाले नाही. मात्र, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
Web Title: fire broke out in the power house of Mahavitran
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study