Home अहमदनगर अहमदनगर: मुळा कारखान्याच्या भुसा गोदामावर वीज कोसळल्याने आग

अहमदनगर: मुळा कारखान्याच्या भुसा गोदामावर वीज कोसळल्याने आग

Ahmednaagr News: मुळा सहकारी कारखाना परिसरात शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वीजेचा मोठा कडकडाट झाल्याने वीज पडून आग (Fire).

Fire due to lightning strike at husk godown of radish factory

नेवासा: नेवासा तालुक्यातील शिंगणापूर रोडवरील मुळा सहकारी कारखाना परिसरात शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वीजेचा मोठा कडकडाट झाल्याने वीज पडून आग लागली. आठ अग्निशामक बंब आग अटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते. सायंकाळी पाच वाजता वीजेचा मोठा कडकडाट झाल्याने परिसरातील नागरिकांत मोठ्या प्रमाणावर घबराट निर्माण झाली होती.

थोड्याच वेळात धुराचे लोट कारखाना परिसरात दिसल्याने तेथे काही क्षणात बघ्यांची मोठी गर्दी झाली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी शनैश्वर देवस्थान, राहुरी नगर परिषद, ज्ञानेश्वर कारखाना, अशोकनगर कारखाना येथील अग्निशामक बंब आले. तसेच गंगामाई कारखाना व पाथर्डी परिषदेसह काही अग्निशामक पथक येण्यासाठी रवाना झालेली होती. या आगीने आसपासच्या पूर्ण भुस्याच्या गोदामाला पेट घेतला. रात्री सात वाजेपर्यंत वेगाने वारा असल्याने आग आटोक्यात आणण्यात अडथळा आला. मुळा कारखान्याचे कर्मचार्‍यांसह अग्निशामक दलाचे पथक ही आग विझवण्यासाठी प्रयत्न करत होते.

Web Title: Fire due to lightning strike at husk godown of radish factory

See Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here