संगमनेर तालुक्यात दोन मजली इमारतीला आग, लाखोंचे नुकसान
Breaking News | Sangamner: दोन मजली सागाची इमारत आगीत जळून भस्मसात झाल्याची घटना.
संगमनेर: तालुक्यातील अंभोरे येथे शुक्रवारी दुपारी सुरजित बाबुराव खेमनर, दगडू भीमा खेमनर, लहानु भिमा खेमनर, सखाराम मंजाबापू खेमनर यांच्या मालकीची दोन मजली सागाची इमारत आगीत जळून भस्मसात झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये जवळपास २० लाखाचे सागवान संसार योगी साहित्याचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. आग कशामुळे लागली हे मात्र समजू शकले नाही.
सुरजित खेमनर व त्यांचे कुटुच संगमनेर येथे नातलगाच्या कामासाठी गेले असता घरी कोणीही नसताना ही आग लागली. घराशेजारीच गोठ्यात गायी, शेळ्या, जनावरे बांधण्यात आली होती. इमारतीला आग लागल्यानंतर तरुणानी बांधलेल्या गायी, शेळ्या सोडून बाजूला नेल्या काही गावकर्यांनी व काही तरुणांनी घराचा दरवाजा तोडून घरातील सामान वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतू सदर दोन मजली घर लाकडाचे असल्याने या घराने लगेच पेट घेतला.
या घटनेमध्ये इमारतीचे वीस लाख रुपये किमतीचे सागाचे लाकूड जर खाक झाली तर लाखो रुपयांचा संसार भस्मसात झाला घटनेची माहिती मिळताच संगमनेर कारखान्याची कारखाना अभिशामक, नगरपालिका अग्निशामक दोन्ही घटनास्थळी दाखल झाली. मात्र घरातील वस्तू जळून खाक झाल्या होत्या.
Web Title: Fire in a two-storey building in Sangamner
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study