Home Ahmednagar Live News अहमदनगर शहरात  बिल्डींगला शॉर्ट सर्किटमुळे आग, मोठे नुकसान

अहमदनगर शहरात  बिल्डींगला शॉर्ट सर्किटमुळे आग, मोठे नुकसान

Ahmednagar News:  अंबर प्लाझा बिल्डिगला आग (Fire ) लागल्याची घटना.

Fire in Ahmednagar city due to short circuit, heavy damage

अहमदनगर : शहरातील अंबर प्लाझा बिल्डिगला आग लागल्याची घटना सोमवारी (दि. १६) सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान घडली असून बिल्डींगमध्ये असलेली दोन कार्यालये आगीच्या भक्षस्थानी सापडली असून दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरील काही भागाला आगीची झळ पोहोचली आहे. या आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र कार्यालयांचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीतून सहा नागरिकांना मनपाच्या अग्निशामक विभागाच्या जवानांनी शिडीच्या साह्याने बाहेर काढून त्यांचे प्राण वाचविण्यात आले आहे. दरम्यान, या आगीमुळे परिसरात आगीच्या धुराचे लोळ पसरले होते. तसेच परिसरात आगीमुळे धुराचे साम्राज्य निर्माण झाले होते.

आगीच्या घटनेची माहिती मिळताच आमदार संग्राम जगताप, कोतवाली पोलिस ठाण्याचे पोनि चंद्रशेखर यादव तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पाहणी करत ताबडतोब प्रशासन यंत्रणा सज्ज केली. तातडीने पोलीस आणि मनपा अग्निशमन दल आगीच्या ठिकाणी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. आग लागलेल्या कार्यालयात अडकलेल्या लोकांना कार्यालयाच्या खिडकीच्या काचा फोडून शिडीच्या सहाय्याने नागरिकांनी सुखरूप बाहेर काढले. इंजि. विजयकुमार पादीर हे देखील या आग लागलेल्या कार्यालयात अडकलेले होते. त्यांना वाचवण्यासाठी नागरिकांची धडपड सुरु होती. त्यांना वाचवण्यात अपयश येत

होते. इंजि. पादीर हे आग लागलेल्या ठिकाणी अडकल्याची माहिती मिळताच त्यांचा मुलगा संकेत हा तेथे पोहचला आणि त्याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जीव धोक्यात घालून आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी बिल्डींगच्या पॅसेजमध्ये प्रवेश केला. मोबाईलच्या सहाय्याने तो वडिलांशी संपर्क साधत राहिला. वडिलांना कशाप्रकारे वाचवता येईल यासाठी तो जीवाचा आटापिटा करत होता. पादीर यांना वाचवण्यासाठी नागरिकांनी सतर्कता दाखवत कार्यालयाच्या खिडकीच्या काचा फोडल्या. बाहेर काढण्यासाठी शिडी लावण्यात आली. मात्र दुर्दैव असे की अंतर जास्त असल्याने शिडी उंचीला कमी पडत होती. यामुळे श्री. पादीर हे बाहेर येण्यासाठी शिडीपर्यंत पोहचत नव्हते.

यावेळी उपस्थितांनी अक्षरश: डोक्यावर शिडी धरत विजयकुमार पादीर यांना त्या शिडीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढले. वडील आगीच्या संकटातून सुखरूप बाहेर आल्याने मुलगा संकेत याने सुटकेचा निश्वास सोडला. या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याचे पहायला मिळाले.

Web Title: Fire in Ahmednagar city due to short circuit, heavy damage

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here