Home Maharashtra News Fire: रुग्णालयाच्या इमारतीला भीषण आग; 1 महिलेचा मृत्यू, 2 जण जखमी

Fire: रुग्णालयाच्या इमारतीला भीषण आग; 1 महिलेचा मृत्यू, 2 जण जखमी

Parekh Hospital Fire:  पारेख हॉस्पिटलच्या इमारतीला आग, कँटीनमध्ये आग लागली. या घटनेते एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर तीन जण जखमी झालेत.

Parekh Hospital Fire

Breaking:  घाटकोपर पूर्वेकडील स्टेशन परिसरात असलेल्या पारेख हॉस्पिटलच्या इमारतीला आग. हॉस्पिटलच्या खाली असलेल्या हॉटेलमध्ये ही आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच सदर ठिकाणी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत असल्याचं पाहायला मिळालं. आग लागलेल्या इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत. हा रुग्णालयाचा परिसर असल्यामुळं तिथे गर्दी असते. रुग्णालयाच्या खाली असणाऱ्या कँटीनमध्ये आग लागली. या घटनेते एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर तीन जण जखमी झालेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

पहिल्या मजल्यापासून असणाऱ्या रुग्णालयापर्यंत आग पोहोचली एकच गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठीची धावपळ सुरु झाली. यामध्ये स्थानिकांकडून सर्वप्रथम रुग्णांना बाहेर काढण्याचं काम सुरु करण्यात आलं. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत रुग्णांपर्यंत मदत पोहोचवण्याचं काम सुरु केलं. तळमजल्यावर असणाऱ्या हॉटेलमध्ये आग लागल्यामुळं या परिसरात एकच खळबळ माजली होती. साधारण 10 ते पंधरा मिनिटांपासून लागलेल्या या आगीनं गंभीर स्वरुप धारण केलं असून, रुग्णालयाच्या इमारतीत आगीचे लोट पसरु लागले. दरम्यान, रुग्णालयाच्या इमारतीत एकूण किती नागरिक होते याची अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.

Earn Money Online | सोशियल मेडिया मनोरंजनासोबत पैसे कमविण्याचा फंडा | जाणून घ्या

प्राथमिकतेनं या रुग्णालयातील व्हेंटिलेटरवर असणाऱ्या आणि इतर सर्वच रुग्णांना बाहेर काढण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहे. रुग्णालयात जाण्यासाठी पर्यायी मार्ग असल्यामुळे रुग्णांना वाचवण्यासाठी त्या मार्गाचाही वापर स्थानिकांनी केला आहे.

दरम्यान, स्थानिकांनी समयसूचकता दाखवत बचावकार्य सुरु केलेलं असतानात अखेर अग्निशमन दल इथं पोहोचलं. इमारतीमध्ये रुग्णांसोबतच तिथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठीसुद्धा स्थानिकांनी मदतीचा हात दिला.

Web Title: fire to hospital building 1 woman killed, 2 injured

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here