Home नगर नगरमध्ये बर्डस हाऊसमध्ये गोळीबार, तिघे ताब्यात

नगरमध्ये बर्डस हाऊसमध्ये गोळीबार, तिघे ताब्यात

Breaking News | Ahmednagar Fire: शहरातील फिश अॅण्ड बर्डस हाऊसमध्ये बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना.

Firing at Bird's House in the city, three detained

अहमदनगर : नगर शहरातील फिश अॅण्ड बर्डस हाऊसमध्ये बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. गोळीबारामागील कारण अद्याप समोर आलेले नाही.

सीराज दौलत खान (वय ४६, रा. नागरदेवळे, ता. नगर), राजेंद्र देवीदास बहुधने (३४, रा. वेदांतनगर, देवगिरी कॉलेजच्या पाठीमागे, छत्रपती संभाजीनगर), प्रदीपकुमार उद्धव तुपेरे (रा. नवोदय हॉस्पिटल, तारकपूर, नगर) या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

येथील मार्केटयार्ड चौकाजवळच एक फिश अॅण्ड बर्डस नावाचे पक्षी विक्रीचे दुकान आहे. या दुकानात गोळीबाराचा प्रकार घडला. त्यावेळी दुकानात पाच जण हजर होते. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी गावठी कट्टा व काडतूस मिळून आले आहे. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून यामधील एक डॉक्टर आहेत. त्यांना दुकानात बोलावून घेतल्यानंतर हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. उर्वरित दोन जणांना ताब्यात घेतल्यानंतरच या घटनेचा उलगडा होईल. पोलीस याचा कसून तपास करीत आहे.

Web Title: Firing at Bird’s House in the city, three detained

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here