Home क्राईम ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव उमेदवाराकडून गोळीबार

ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव उमेदवाराकडून गोळीबार

Pune Crime: निकालाचा जल्लोष सुरु असताना निकालानंतर हाणामारी अन् गोळीबाराच्या (Firing) घटना, दोघांना अटक.

Firing by losing candidate in Gram Panchayat election

पुणे: पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल सोमवारी लागला. या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकत अजित पवार यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील ३२ पैकी ३० जागांवर विजय मिळवला. दोन जागा भाजपच्या वाटेला गेल्या. या निवडणुकीत काँग्रेस आणि शरद पवार गटाचे अस्तित्व बारामती तालुक्यात दिसले नाही. एकीकडे या निकालाचा जल्लोष सुरु असताना निकालानंतर हाणामारी अन् गोळीबाराच्या घटना घडल्या. इंदापूर तालुक्यातील काझडमध्ये निवडणुकीत पराभूत झाल्याने हवेत गोळीबार केला गेला. या प्रकरणी वालचंदनगर पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

इंदापूर तालुक्यातील काझड गावात गोळीबार करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य पदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्यामुळे गावात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने राहुल चांगदेव नरुटे आणि समीर नरुटे यांनी शिवीगाळ करून हवेत गोळीबार केला. प्रकरणी गणेश शिवदास काटकर यांच्या फिर्यादीवरुन राहुल चांगदेव नरुटे आणि समीर मल्हारी नरुटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

Web Title: Firing by losing candidate in Gram Panchayat election

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here