धक्कादायक! बस स्थानक परिसरात अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार
Beed Crime: बस स्थानक परिसरात अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार (Firing) केल्याची धक्कादायक घटना, परिसरात एकच खळबळ.
बीड: बीडच्या परळी शहरात बस स्थानक परिसरात अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आज रविवारी सकाळी 6 च्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती हाती आली आहे.
बीडच्या परळी बस स्थानकात अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पत्र्याच्या शेडमधून आणि काचांमधून गोळी आरपार गेली.
याबाबत अधिक माहिती अशी की, परळी शहरातील बसस्थानकासमोर अज्ञाताने गोळीबार केला. यावेळी दोन गोळ्या हवेत झाडल्या. यादरम्यान ही गोळी पत्र्याच्या शेडमधून आरपार गेल्याचे सांगण्यात येत आहे. गोळीबार कोणी व का केला ? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तसेच गोळी झाडणाऱ्या अज्ञात आरोपीचा शोध परळी शहर पोलीस घेत आहे.
Web Title: Firing by unknown person in bus station area
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App