पिझ्झा डिलीव्हरीला उशीर झाला म्हणून गोळीबार!
Pune Crime: पिझ्झा डिलिव्हरी बॉय ला मारहाण करत हवेत फायरिंग (Firing) केल्याचा धकादायक प्रकार.
पुणे : पिझ्झा डिलिव्हरी देण्यासाठी उशीर झाल्यानं चिडलेल्या ग्राहकानं पिझ्झा डिलिव्हरी बॉय ला मारहाण करत हवेत फायरिंग केल्याचा धकादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील वाघोली परिसरात असलेल्या वाघेश्वर मंदिराजवळील हा गंभीर प्रकार घडाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, चेतन वसंत पडवळ असे डिलिव्हरी बॉयला मारहाण करुन फायरिंग करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. तर रोहित राजकुमार हुलसुरे हा वाघोली परिसरात असलेल्या एका पिझ्झा सेंटरमध्ये पिझ्झा डिलिव्हरी बॉयचे काम करतो. काल रात्री उशिरा आरोपी चेतन पडवळ याने ऑनलाईन पिझ्झा डिलिव्हरीची ऑर्डर केली होती. दरम्यान पिझ्झा डिलिव्हरीची ऑर्डर डिलिव्हरी बॉय रोहित हुलसुरे याने उशिरा पोहोचवल्यानंतर संतापलेल्या आरोपीने रोहितला मारहाण केली.
या मरहाणीचा जाब विचारण्यासाठी पिझ्झा डिलिव्हरी केंद्रातील देवेंद्र, राहुल आणि इतर काहीजण गेले असता आरोपीने या सर्वांना मारहाण करत त्याच्या कारमधून एक पिस्तूल काढून हवेत फायरिंग केली. या प्रकरणी आरोपी चेतन पडवळ याच्यावर लोणीकंद पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Firing due to delayed pizza delivery
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App