क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून गोळीबार, दोन गटांत हाणामारी
Breaking News | Pune Crime: क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून गोळीबार (Firing) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पुणे : क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून गोळीबार करण्यात आल्याची घटना कात्रजमधील संतोषनगर भागात बुधवारी सायंकाळी घडली. गोळीबारात कोणी जखमी झाले नाही. मात्र, त्यानंतर दोन गटांत झालेल्या हाणामारीमध्ये दोन तरुणांवर शस्त्राने वार करण्यात आले.
संतोषनगर भागातील घुंगुरवाला चाळ परिसरात तरुण बुधवारी सायंकाळी क्रिकेट खेळत होती. त्या वेळी तरुणांच्या दोन गटांत वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. त्या वेळी एकाने पिस्तुलातून गोळीबार केला. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. दोन तरुणांवर शस्त्राने वार करण्यात आले.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून, तो सराइत असल्याची माहिती देण्यात आली. गोळीबार झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
Web Title: Firing due to dispute while playing cricket, clash between two groups
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study