Home क्रीडा IPL Mega Auction : पहिल्या यादीत ‘इतक्या’ खेळाडूंची नाव; या ‘बड्या’ खेळाडूंची...

IPL Mega Auction : पहिल्या यादीत ‘इतक्या’ खेळाडूंची नाव; या ‘बड्या’ खेळाडूंची माघार

IPL Auction Chris Gayle

IPL Auction : आयपीएलमधील दहा संघांनी या अगोदरच आपले मोजके खेळाडू रिटेन केले आहेत. पुढील महिन्यात 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी आयपीएलचं मेगा ऑक्शन बंगळूर येथे होणार आहे. आयपीएलच्या या हंगामापासून लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नव्या संघाचा समावेश झाल्यानं मेगा ऑक्शन रंगतदार होणार आहे.

आयपीएल 2022 मध्ये होणाऱ्या लिलावासाठी जगभरातील 1,214 खेळाडूंनी आपलं नाव नोंदवलं आहे. यामध्ये 896 भारतीय आणि 318 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. 1214 खेळाडूंमध्ये 270 खेळाडू हे राष्ट्रीय संघातुन खेळलेले आहेत तर 103 खेळाडू अनकॅप आहेत. मात्र आयपीएल लिलावा मधून अनेक दिग्गज खेळाडूंनी आपलं नाव माघारी घेत आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतलेला आहे.

वेस्ट इंडिजचा स्टार खेळाडू मिस्टर युनिव्हर्स ख्रिस गेल याने वाढत्या वयामुळे आयपीएलमधून माघार घेतली आहे. मागील हंगामात ख्रिस गेलने पंजाब संघाचे प्रतिनिधित्व केलं होतं. मात्र आगामी हंगामात गेल खेळताना दिसणार नाही. त्याचबरोबर जो रुट, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, सॅम करन, मिचेल स्टार्क आणि ख्रिस वोक्स या स्टार खेळाडूंनी देखील आयपीएलच्या लिलावातून आपलं नाव माघारी घेतलं आहे.

कोणत्या देशातील किती खेळाडूंनी नोंदवली नावं

भारत (896), ऑस्ट्रेलिया (59), दक्षिण आफ्रिका (48), वेस्ट इंडीज (41), श्रीलंका (36), इंग्लंड (30), न्यूझीलंड (29), अफगाणिस्तान (20), नेपाळ (15), अमेरिका (15), बांगलादेश (09), नामिबिया (05), आयर्लंड (03), ओमान (03), झिम्बाब्वे (02), नेदरलँड्स (01), स्कॉटलँड (01), युएई (01) आणि भूटान (01)

Web Title : First list for IPL auction announced; Withdrawal of several players, including Chris Gayle

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here