Home अहमदनगर ठाकरे गटाकडून शिर्डी मतदार संघात यांना उमेदवारी जाहीर, १७ उमेदवारांची नावे

ठाकरे गटाकडून शिर्डी मतदार संघात यांना उमेदवारी जाहीर, १७ उमेदवारांची नावे

lok sabha election 2024: हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर.

First list of Thackeray group announced lok sabha election

मुंबई: ठाकरे गटाची आज पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये १७ उमेदवारांची नावे आहेत. औरंगाबादमधून चंद्रकांत खैरे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. सांगलीतून चंद्रहार पाटील यांना संधी देण्यात आली आहे. रायगडमधून अनंत गीते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परभणीमधून संजय जाधव यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

उबाठा गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी यादी तयार असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार आज सकाळी नऊ वाजता उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. ते म्हणालेत की, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे.

उमेदवारांची संपूर्ण यादी

मतदारसंघ– उमेदवाराचे नाव

ठाणे- राजन विचारे

मुंबई-ईशान्य- संजय दिना पाटील

मुंबई-दक्षिण- अरविंद सावंत

मुंबई वायव्य- अमोल कीर्तीकर

बुलढाणा- नरेंद्र खेडेकर

यवतमाळ-वाशिम- संजय देशमुख

मावळ- संजोग वाघेरे-पाटील

सांगली- चंद्रहार पाटील

हिंगोली- नागेश पाटील आष्टीकर

संभाजीनगर- चंद्रकांत खैरे

धाराशिव- ओमराजे निंबाळकर

शिर्डी- भाऊसाहेब वाघचौरे

नाशिक- राजाभाऊ वाजे

रायगड- अनंत गीते

सिंधुदुर्ग-रत्नागिरी- विनायक राऊत

परभणी- संजय जाधव

Web Title: First list of Thackeray group announced lok sabha election

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here