आधी शाळेत, नंतर शिकवणीवेळी घरातही बलात्कार
Breaking News | Mumbai Rape Case: एका शाळेत 14 वर्षीय विद्यार्थिनीवर शाळेतील शिक्षकानेच बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर.
मुंबई : महिलांवरील अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होताना दिसून येत नाही. त्यातच, पोक्सो अंतर्गंत असलेले गुन्हे देखील राजरोजपणे घडत आहेत. आता, पुन्हा एकदा एका शालेय मुलीवर बलात्काराची घटना उघडकीस आली आहे.
नालासोपारा पूर्व येथील एका शाळेत 14 वर्षीय विद्यार्थिनीवर शाळेतील शिक्षकानेच बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पेल्हार पोलिसांनी आरोपी शिक्षक (अमित दुबे) याला अटक केली आहे. त्याला वसई न्यायालयाने 16 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
शाळेतील हा आरोपी शिक्षक हा मुलीची खासगी शिकवणी ही घ्यायचा, त्याने पीडित विद्यार्थींनीबरोबर शाळा आणि क्लासमध्ये ही 5 महिने लैंगिक अत्याचार केल्याचं मुलीच्यावतीने देण्यात आलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे. मुलीसोबत घडलेला अत्याचारा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडिताच्या आईने पेल्हार पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. त्यानंतर, पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला आहे. पेल्हार पोलिसांनी आरोपीवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 64 (2) (एफ) 65 (1) तसेच बालकांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो)च्या कलम 4, 5. 8 आणि 12 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
Web Title: First rape at school, later at home during teaching
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study