Home महाराष्ट्र Accident: ओव्हरटेक करणाच्या नादात ट्रक आणि तवेराचा भीषण अपघात, पाच ठार

Accident: ओव्हरटेक करणाच्या नादात ट्रक आणि तवेराचा भीषण अपघात, पाच ठार

Five killed as truck overturns in overtaking accident

अमरावती | Amravati: शहरातील रहाटगाव रिंगरोडवर ओव्हरटेक करणाच्या नादात ट्रक आणि तवेराचा धडक बसल्याने भीषण अपघात (Accident) घडला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भीषण अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  अपघाती ट्रक अमरावती वरून नागपूरकडे जात होता. तर तवेरा अमरावती वरून वलगावच्या दिशेनं जात होती,  तवेरा वाहनातील मयत आणि जखमी हे अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव बारी येथील रहिवासी असून मुलाच्या लग्नाच्या बोलणी करण्यासाठी पोकळे परिवार जात असल्याची माहिती मिळत  आहे. त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Web Title: Five killed as truck overturns in overtaking accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here