संगमनेर टोलनाक्यावर तीन बंधूना मारणारे पाच जण पोलिसांच्या ताब्यात
Sangamner Crime: संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. त्यापैकी पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
संगमनेर: येथील व्यावसायिक कासट बंधूंना नाशिक- पुणे महामार्गावर तालुक्यातील हिवरगाव पावसा टोलनाक्यावर बेदम मारहाण झाल्याची घटना २८ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. त्यापैकी पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, यात एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे.
प्रथमेश धनंजय जाधव (वय १९), संदीप राजाराम जाधव (वय १८), जयेश बंडू भोर (वय २२), गणेश भीमराव लोणे (वय २२) (सर्व रा. पिंपळगाव खांब, जि. नाशिक) आणि एक विधीसंघर्षग्रस्त बालक अशा पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी गुन्हा केल्याचे मान्य केले आहे. त्यासंदर्भाने तालुका पोलिसांनी पत्रक प्रसिद्धीला दिले आहे. ही कामगिरी संगमनेरचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे, पोलिस उपनिरीक्षक शालोमन सातपुते, पोलिस हेडकॉन्स्टेबल आशिष आरवडे, पोलिस नाईक सचिन उगले, बाबासाहेब शिरसाठ यांनी केली. अतुल राधावल्लभ कासट (रा. मेनरोड, संगमनेर) यांनी दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला होता. त्यांच्यासह त्यांचे बंधू अमित कासट, अमरीश कासट यांनाही बेदम मारहाण करण्यात आली.
Web Title: Five persons who beaten three brothers at toll booth are in police custody
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News