सशस्त्र दरोडा टाकणारे पाच दरोडेखोर जेरबंद, उसाच्या शेत्तात पळाले पण….
Ahmednagar News | Shevgaon: सशस्त्र दरोडा टाकणारे पाच दरोडेखोर स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले (Arrested).
अहमदनगर | शेवगाव : सशस्त्र दरोडा टाकणारे पाच दरोडेखोर स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहेत. शेवगाव येथील कुटुंबियांना चाकूचा धाक दाखवत 1 लाख 8 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल दरोडा टाकून लंपास केल्याची घटना घडली होती.
दीपक गौतम पवार (वय 35 वर्षे, रा. टाकळीअंबड, ता.पैठण), नितीन मिसऱ्या चव्हाण (वय 20 वर्षे, रा.जोडमालेगांव, ता. गेवराई), गोविंद गौतम पवार (वय 20 वर्षे,रा.टाकळीअंबड, ता.पैठण), किशोर दस्तगीर पवार (वय 19 वर्षे, रा.हिरडपुरी, ता.पैठण), राजेश दिलीप भोसले (वय 30 वर्षे, रा.टाकळी अंबड, ता.पैठण) असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी त्यांच्याकडून मोबाईल, रोख रक्कम,शेळ्या, मोटारसायकल असा एकूण 2 लाख 49 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, 21 डिसेंबर 2023 रोजी फिर्यादी कमलेश सुभाष वाल्हेकर (वय 23 वर्षे, रा. चापडगांव शिवार, चापडगांव, ता.शेवगाव) हे त्यांच्या कुटुंबासह घरामध्ये झोपले होते. रात्री 1 च्या सुमारास चोरट्यांनी घरात प्रवेश केला. कुटुंबियांना चाकूचा धाक दाखवत 1 लाख 8 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल दरोडा टाकून लांबवला. त्यानंतर 24 डिसेंबर 2023 रोजी अभय राधाकिसन पायघन (वय 24 वर्षे, रा.आखेगाव, ता.शेवगाव) यांच्या घरात रात्री 1 च्या सुमारास चोर घुसले. घरातील महिला मंगल पायघन व रामकिसन काटे यांना मारहाण करत मुद्देमाल लांबवला. वरील घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना विशेष पथक नेमून गुन्हेगरांचा शोध घेण्यास सांगितले.
आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि सोपान गोरे, पोहेकॉ मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, संतोष लोढे आदींसह पोलीस अधिकारी व अंमलदार यांची दोन विशेष पथके तयार करून कारवाईस सुरवात केली. आहेर यांना गुप्तबातमीद्वारे हा गुन्हा दीपक गौतम पवार व इतर साथीदारांनी केल्याचे समजले व ते टाकळीअंबड येथील घरी व घरासमोर असलेल्या पालावर आलेले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ही पथके तेथे रवाना झाली.
पोलिसांनी घराजवळ सापळा लावला. पोलिसांची चाहूल लागताच दरोडेखोर उसाच्या शेतात पळून गेले. पोलिसांनी तत्परतेने वरील आरोपींना ताब्यात घेतले. यातील आरोपींवर विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.
पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ टाकळीअंबड,ता. पैठण येथे जावुन दिपक गौतम पवार याचे घरास व त्याचे घरासमोरील असलेल्या पालांना चोहोबाजुने सापळा लावला असता सदर पालांमधुन काही इसम जवळच असलेल्या ऊसाचे शेतामध्ये पळुन गेले.पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी घरातील व पालामधील तसेच ऊसामध्ये जावुन लपुन बसलेल्या इसमांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नाव गांव विचारता त्यांनी त्यांचे नावे 1) दिपक गौतम पवार रा.टाकळी अंबड,ता.पैठण,जि.छ. संभाजीनगर, 2) नितीन मिसऱ्या चव्हाण रा.जोड मालेगांव,ता.गेवराई, जि. बीड, 3) गोविंद गौतम पवार रा.टाकळी अंबड,ता.पैठण, जि.छ.संभाजीनगर, 4) किशोर दस्तगीर पवार रा. हिरडपुरी,ता.पैठण,जि.छ. संभाजीनगर, 5) राजेश दिलीप भोसले रा.टाकळी अंबड,ता.पैठण,जि.छ. संभाजीनगर असे असल्याचे सांगितले.
त्यांचे कडे गुन्ह्याबाबत सखोल विचारपुस करता त्यांनी त्यांची इतर फरार साथीदार नामे 6) सोन्या मजल्या भोसले रा. खंडाळा, ता. पैठण, जि. छ. संभाजीनगर, 7) उद्या मजल्या भोसले रा. टाकळी अंबड, ता. पैठण, जि. छ. संभाजीनगर, 8) संभाजी गौतम पवार रा. सदर, 9) अभिषेक भैया चव्हाण रा. खंडाळा, ता. पैठण, जि. छ. संभाजीनगर, 10) संभाजी गौतम पवार याचा मित्र नांव गांव माहित नाही यांचे सोबत गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.मिळुन आलेल्या आरोपींची अंगझडती तसेच त्यांचे घराची व पालाची झडती घेता त्यांचे कडे गुन्ह्यातील चोरीस गेले मालापैकी,मोबाईल, रोख रक्कम,शेळ्या,मोटारसायकल असा एकुण 2,49,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन त्यांना ताब्यात घेवुन पुढील तपासकामी शेवगांव पोलीस स्टेशन या ठिकाणी हजर करण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.
Web Title: Five robbers Arrested for armed robbery
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App