Home Uncategorized पाच वर्षीय चिमुकलीचा सिटी लिंक बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

पाच वर्षीय चिमुकलीचा सिटी लिंक बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

Breaking News | Nashik Accident: पाच वर्षीय चिमुकलीचा सिटी लिंक बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वाहन.

Five year old girl crushed to death under bus

नाशिक: शहरातील सिटी लिंक बसखाली येऊन चिरडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. चिमुरडीच्या मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. सिटीलिंक बस सुरू झाल्यापासून सतत वादग्रस्त असून बस चालक वर्दळी आणि सिग्नल जवळ सायकल फिरवतात, अशी बसेस अपघात होईल अशा वेगाने चालवीत असल्याने अनेकदा अपघातास कारणीभूत ठरतात. या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे. 

यापूर्वीही सिटी लिंक बसमुळे नागरिकांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी अपघाताची पुनरावृत्ती होऊन एका पाच वर्षीय मुलीचा नाहक बळी गेला. गाडेकर मळा परिसरात असलेल्या सिटी लिंक बसडेपोच्या आवारात सिटी लिंक बसने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात पाच वर्षाची चिमुरडी ठार झाली असून या अपघातानंतर संतप्त झालेल्या जमावाने सिटी लिंक बस महाव्यवस्थापनाला धारेवर धरले.

अपघात करून बस चालक फरार झाला असून संबंधित बस चालक हा दारू पिलेला असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केलेला आहे. संतप्त जमावाने बस फोडण्याचा प्रयत्न केला पण वेळीच नाशिकरोड पोलिस दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला. सानवी सागर गवई वय पाच वर्ष राहणार मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर, रेल्वे माल धक्का, नाशिक रोड अपघातात ठार झालेल्या बालिकेचे नाव आहे.

अपघातात ठार झालेली सानवी आदर्श विद्यामंदिर मध्ये इयत्ता पहिली मध्ये शिकत असून शाळेतून आजोबा सोबत घरी जात असताना सिटी लिंक बस डेपोच्या आवारात एम.एच. १५ जी. व्ही ७७१९ सदरच्या बसची धडक बसल्याने चिमुरडी जागीच ठार झाली. दरम्यान या अपघातानंतर बस चालक हा तिथून फरार झाला.

सदरची घटना आजूबाजूच्या नागरिकांना व माल धक्का परिसरात असलेल्या कामगारांना समजताच मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिक व कामगार जमा झाले. यावेळी अनेक नागरिक व कामगारांनी डेपो व्यवस्थापनाला धारेवर धरून याप्रकरणी जाब विचारला.

दोन तास नागरिकांनी मृतदेह गाडीखालून काढून दिला नव्हता. पोलिसांच्या मध्यस्थीने मृतदेह गाडीखालून काढण्यात आला. अपघात प्रकरणी तातडीने बस चालकाला अटक करून कारवाई करावी अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली.

Web Title: Five year old girl crushed to death under bus

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here